जर्मनीने २००६ मध्ये झालेल्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे संयोजनपद मिळावे यासाठी आर्थिक प्रलोभनांचा उपयोग केला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याकरिता आदिदास या बहुराष्ट्रीय कंपनीने आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाशी मखलाशी केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

डेर स्पेजेल या नियतकालिकेने याबाबत म्हटले आहे की, ‘‘जर्मन फुटबॉल महासंघाने २००० सालामध्ये आदिदास कंपनीकडून मोठय़ा प्रमाणात रक्कम घेतली होती व या रकमेचा विनियोग विश्वचषक संयोजनपदासाठी चार आशियाई सदस्यांची मते मिळविण्याकरिता करण्यात आला.’’
जर्मन फुटबॉल महासंघाने या आरोपांचे खंडन केले आहे. आदिदास कंपनीने आपला या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचे म्हटले आहे.