News Flash

“पृथ्वी गोल नाही, तर…”; इंग्लंडच्या माजी क्रिकेटपटूचा अजब दावा

नक्की काय आहे 'त्या'चा नवीन शोध...

करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. सुमारे दोन लाखांहून अधिक लोकांना करोना व्हायरसचा फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे. विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. डॉक्टर आणि रूग्णालयातील इतर सहकाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे जवळपास ७८ हजार लोक करोनातून पूर्णपणे बरे झाले असल्याची माहिती आहे. त्यामुळे योग्य ती काळजी आणि उपचार घेतल्यास हा आजार बरा होऊ शकतो, यावर साऱ्यांचा विश्वास असून भारतातही याबाबत जनजागृती केली जात आहे. करोनाचा फटका क्रीडा विश्वालाही बसला असून बहुतांश क्रीडास्पर्धा रद्द झाल्या आहेत.

“हनुमानजी तर Amazon, Flipkart पेक्षाही फास्ट”; वाचा नेटिझन्सच्या भन्नाट कमेंट्स…

क्रिकेटच्या स्पर्धादेखील काही काळ स्थगित करण्यात आल्या असून IPL चे आयोजन लांबणीवर ढकलण्यात आले आहे. करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्व क्रिकेटपटू चाहत्यांना घरी बसण्याचे आणि सावधनता बाळगण्याचा सल्ला देत आहेत. या दरम्यान, काही क्रिकेटपटू टीक-टॉकवर व्हिडीओ बनवण्यात व्यस्त आहेत. काही नव्या पाककला करण्यात धन्यता मानत आहेत, तर काही लाईव्हच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी संपर्कात आहेत. या दरम्यान, इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू अँड्र्यू फ्लिंटॉफने एक अजब दावा केला आहे.

पाक क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षांची भारताविषयी दर्पोक्ती, म्हणाले…

पृथ्वी ही गोलाकार आहे असे सामान्यत: मानले जाते. अर्थात पृथ्वीच्या आकारावरून अनेक वाद झाले आहेत. या वादात फ्लिंटॉफने उडी घेतली आहे. “पृथ्वीचा आकार गोलाकार नसून तो आकार कांद्याच्या पातीतील कंदमुळासारखा आहे. पृथ्वी पॅनकेकसारखी सपाट नाही. पृथ्वीचा आकार दोन्ही बाजूने किंचितसा गोलाकार आहे, पण तो पूर्ण गोल नाही”, असा अजब दावा फ्लिंटॉफने टॉकस्पोर्ट्सशी बोलताना केला आहे.

Video : भारतीय महिला क्रिकेटपटूचा धमाकेदार डान्स पाहिलात का?

दरम्यान, सध्या त्याच्या या दाव्यावरून बरीच चर्चा रंगलेली दिसत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2020 2:17 pm

Web Title: covid 19 england cricketer andrew flintoff claims earth is not perfect sphere circular amid coronavirus lockdown interview vjb 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 पाक क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षांची भारताविषयी दर्पोक्ती, म्हणाले…
2 Video : भारतीय महिला क्रिकेटपटूचा धमाकेदार डान्स पाहिलात का?
3 क्रीडाक्षेत्रासाठी अयोग्य काळ!
Just Now!
X