News Flash

करोनाची भीती : बांगलादेशचा श्रीलंका दौरा पुढे ढकलला

आयसीसीने दिली माहिती

बांगलादेश क्रिकेट संघाचा प्रस्तावित श्रीलंका दौरा करोना विषाणूमुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता पुढे ढकलण्यात आला आहे. जुलै महिन्यात बांगलादेशचा संघ श्रीलंकेत जाणार होता. या दौऱ्यात दोन्ही संघ ३ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. आयसीसीने याबद्दल आपल्या सोशल मीडियावर माहिती दिली आहे.

याआधी न्यूझीलंडने करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता आपला बांगलादेश दौरा रद्द केला होता. आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतर्गत न्यूझीलंड बांगलादेशविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार होता. काही दिवसांपूर्वी बांगलादेशचा माजी कर्णधार मश्रफी मोर्ताझालाही करोनाची लागण झाली होती. जुलै महिन्यात इंग्लंड विरुद्द वेस्ट इंडिज यांच्यात कसोटी मालिका रंगणार आहे. ही स्पर्धा लॉकडाउननंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं पुनरागमन ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2020 9:41 pm

Web Title: covid 19 impact bangladeshs tour of sri lanka postponed psd 91
Next Stories
1 टी-२० विश्वचषकाचं भवितव्य गुरुवारी ठरणार?? आयोजन पुढे ढकललं जाण्याचे संकेत
2 जसप्रीत बुमराहला कसं मिळालं भारतीय कसोटी संघाचं तिकीट, जाणून घ्या…
3 १० करोनाग्रस्त क्रिकेटपटूंच्या मुद्द्यावरून पाकिस्तानी खेळाडू संतापला, म्हणाला…
Just Now!
X