करोनाच्या तडाख्यामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. लाखो लोकांना करोना व्हायरसचा फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे. विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. सध्याच्या घडीला भारतासह संपूर्ण जग करोना विषाणूविरोधात लढत आहे. भारताचा शेजारी देश पाकिस्तानमध्येही करोनामुळे हालाकीची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा खडतर परिस्थितीत करोनासाठी निधी उभारण्यासाठी भारत-पाक सामने भरवावेत, अशी मागणी माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तरने केली होती.

सचिनने नव्हे, ‘या’ महिला क्रिकेटरने ठोकलंय वन-डे मधलं पहिलं द्विशतक

शोएबने ही मागणी करताच तो चांगलाच ट्रोल झाला. माजी कर्णधार कपिल देव यांनी त्याच्या या प्रस्तावाला थेट केराची टोपली दाखवत आम्हाला अशाप्रकारे निधी जमा करायची गरज नाही, असे स्पष्टपणे सांगितले. त्या पाठोपाठ भारताचे लिटल मास्टर सुनील गावसकर यांनीदेखील हा प्रस्ताव नाकारला. “एकवेळ लाहोरमध्ये बर्फ पडण्याची शक्यता जास्त आहे, पण सध्या भारत-पाकिस्तानमध्ये क्रिकेट मालिका शक्य नाही. ICC च्या स्पर्धांमध्ये दोन्ही संघ समोरासमोर येत आहेत, तितपर्यंत ठीक आहे; पण दोन देशांमध्ये द्विपक्षीय क्रिकेट मालिका सध्याच्या घडीला शक्यच नाही”, असे गावसकर एका यू-ट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत बोलले.

वांद्रे प्रकरण : आदित्य ठाकरेंना टॅग करून हरभजनचं सडेतोड मत

गावसकरांच्या या मुलाखतीला शोएबने ट्विटच्यामार्फत उत्तर दिले. शोएबने एक फोटो ट्विट केला. त्यात रस्त्यावर चहूबाजूला बर्फच बर्फ पसरलेला दिसला. त्या फोटोचा आधार घेत अख्तरने गावसकर यांना उत्तर दिले की लाहोरमध्ये गेल्या वर्षी बर्फ पडला होता, त्याचा हा फोटो आहे. त्यामुळे या जगात काहीच अशक्य नाही, असे म्हणत अख्तरने गावसकरांना पुराव्यानिशी उत्तर दिले.

पंतप्रधान मोदींनंतर आफ्रिदीचे आणखी एका भारतीयावर टीकास्त्र, म्हणाला…

दरम्यान, भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सामने खेळले जावेत. त्या निधीचा करोनाविरोधात लढण्यासाठी वापर करावा, असे मत शोएब अख्तरने व्यक्त केले होते. त्यावर “शोएबला त्याचं मत मांडण्याचा हक्क आहे, पण माझ्या मते आपल्याला पैशांसाठी भारत-पाक सामन्यांची गरज नाही. आपल्याकडे पुरेसा पैसा आहे”, असे कपिल देव यांनी म्हटले होते. कपिल देव यांच्या वक्तव्यावर “मला काय म्हणायचं आहे हे कपिल भाईंना समजलंच नाही. प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार आहे. कदाचित त्यांना पैशांची गरज नसेल, पण इतरांना ती नक्कीच आहे. त्यामुळे माझ्या मते मी सुचवलेल्या पर्यायावर भविष्यात नक्कीच विचार होईल”, असे स्पष्टीकरण शोएबने दिले.