News Flash

Video : भारतीय महिला क्रिकेटपटूचा धमाकेदार डान्स पाहिलात का?

व्हिडीओ पोस्ट केल्यावर काही वेळातच लाखो व्ह्यूज..

करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. सुमारे दोन लाखांहून अधिक लोकांना करोना व्हायरसचा फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे. विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. डॉक्टर आणि रूग्णालयातील इतर सहकाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे जवळपास ७८ हजार लोक करोनातून पूर्णपणे बरे झाले असल्याची माहिती आहे. त्यामुळे योग्य ती काळजी आणि उपचार घेतल्यास हा आजार बरा होऊ शकतो, यावर साऱ्यांचा विश्वास असून भारतातही याबाबत जनजागृती केली जात आहे. करोनाचा फटका क्रीडा विश्वालाही बसला असून बहुतांश क्रीडास्पर्धा रद्द झाल्या आहेत.

वांद्रे प्रकरण : आदित्य ठाकरेंना टॅग करून हरभजनचं सडेतोड मत

भारतात धर्म मानल्या जाणाऱ्या क्रिकेटच्या स्पर्धादेखील काही काळ स्थगित करण्यात आल्या असून IPL चे आयोजन लांबणीवर ढकलण्यात आले आहे. करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्व क्रिकेटपटू चाहत्यांना घरी बसण्याचे आणि सावधनता बाळगण्याचा सल्ला देत आहेत. या दरम्यान, काही क्रिकेटपटू टीक-टॉकवर व्हिडीओ बनवण्यात व्यस्त आहेत. भारताचा फिरकीपटू युझवेंद्र चहल यात आघाडीवर आहे. त्याच्या पाठोपाठ आता भारतीय महिला क्रिकेटपटू वेदा कृष्णमूर्ती ही देखील टीक-टॉकच्या प्रेमात असल्याचे दिसत आहे.

सचिनने नव्हे, ‘या’ महिला क्रिकेटरने ठोकलंय वन-डे मधलं पहिलं द्विशतक

ऑस्ट्रेलियात नुकत्याच झालेल्या महिला टी २० विश्वचषक स्पर्धेत भारताची क्रिकेटपटू जेमिमा रॉड्रिग्जचे डान्स हिट झाला होता. आता भारतीय संघातील खेळाडू वेदा कृष्णमूर्तीचा डान्स सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. वेदा कृष्णमूर्तीने तिच्या डान्सचा एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना तिने Lockdown Moves असे कॅप्शनही दिले आहे.

भारत-पाक क्रिकेटवरून अख्तरचा सुनील गावसकरांवर पलटवार

 

View this post on Instagram

 

Lockdown moves be like !! #foryou

A post shared by Veda Murthy (@vedakrishnamurthy7) on

या व्हिडिओला काही वेळातच एक लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले. सोशल मीडियावर वेदाच्या डान्सचे सर्वत्र कौतुक होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2020 9:49 am

Web Title: covid 19 lockdown watch female cricketer veda krishnamurthy showing dance moves video amid coronavirus crisis vjb 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 क्रीडाक्षेत्रासाठी अयोग्य काळ!
2 ‘आयपीएल’मधील निवड गुणवत्तेवरून!
3 ‘टूर डी फ्रान्स’ ऑगस्टअखेरीस!
Just Now!
X