कोलकाता शहरताली वाढती करोनाबाधित रुग्णसंख्या पाहता, ऐतिहासीक इडन गार्डन्स मैदानाचा वापर आता कोविड सेंटर म्हणून करण्यात येणार आहे. इडन गार्डन्स मैदानातील गॅलरी भागात कोविड सेंटरची उभारणी करण्यात येणार आहे. कोलकाता पोलिसांनी काही दिवसांपूर्वी बंगाल क्रिकेट असोसिएशनला याबद्दल परवानगी मागितली होती. बंगाल क्रिकेट असोसिएशनने दिलेल्या परवानगी नंतर कोविड सेंटर उभारणीच्या कामाला सुरुवात झाली असून लवकरच हे सेंटर कार्यान्वित करण्यात येणार आहे.

सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचं पालन करुन रुग्णांसाठी बेड, पंखे यांची सोय करण्यात आलेली आहे. “कोलकाता पोलिसांनी आम्हाला कोविड सेंटर उभारण्याची विनंती केली होती. त्यानुसार आम्ही मैदानाच्या E आणि F गॅलरी समोरील भागात सुविधा तयार केली आहे. येत्या काही दिवसांमध्ये हे कोविड सेंटर रुग्णांसाठी वापरता येईल. याव्यतिरीक्त F Block समोर आमचं एक छोटंसं हॉस्पिटल आहे त्याचाही वापर करता येईल”, अशी माहिती बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अविशेक दालमिया यांनी इंडियन एक्स्प्रेशशी बोलताना दिली.

खबरदारीचा उपाय म्हणून मैदानाची देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सोय दुसऱ्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत पश्चिम बंगाल आणि कोलकाता शहरात वाढत्या रुग्णसंख्येवर आळा घालण्यास सरकारला यश येतं का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.