News Flash

४ षटकं – ३ निर्धाव – १ धाव – २ बळी; जाणून घ्या कोणत्या गोलंदाजाने केली ही ऐतिहासिक कामगिरी?

टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात किफायतशीर गोलंदाजीची नोंद

मोहम्मद इरफानची ऐतिहासीक कामगिरी

पाकिस्तानचा उंचपुरा गोलंदाज मोहम्मद इरफानने टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात किफायतशीर गोलंदाजीचा विक्रम प्रस्थापित केला आहे. २५ ऑगस्ट रोजी कॅरेबियन प्रिमीअर लीग स्पर्धेत खेळत असताना, मोहम्मदने बार्बाडोस ट्रायडंट संघाकडून ४ षटकं – ३ निर्धाव – १ धाव – २ बळी अशी कामगिरी केली आहे. सेंट किट्स विरुद्ध खेळताना मोहम्मद इरफानने ही करामत करुन दाखवली आहे. मात्र त्याची ही कामगिरी संघाला विजय मिळवून देण्यासाठी पुरेशी ठरली नाही. सेंट किट्सने सामन्यात ६ गडी राखून विजय मिळवला.

बार्बाडोस संघाने प्रथम फलंदाजी करताना १४७ धावांपर्यंत मजल मारली. १४८ धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या सेंट किट्सची सुरुवात खराब झाली. मोहम्मद इरफानने सलामीवीर ख्रिस गेल आणि एविन लुईसचा अडसर दूर केला. मात्र ब्रँडन किंगने केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर सेंट किट्सने सामन्यात विजय मिळवला. या कामगिरीनंतर मोहम्मद इरफानचं सर्वच स्तरातून कौतुक होताना दिसत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2018 10:31 am

Web Title: cpl 2018 mohammad irfan records most economic t20 figures in defeat
Next Stories
1 Asian Games 2018 Blog : कबड्डीतला पराभव जितका धक्कादायक तितकाच चिंताजनक !
2 डॉन ब्रॅडमन यांना गुगलकडून मानवंदना, ११० व्या वाढदिवसानिमीत्त खास डूडल
3 Asian Games 2018 Day 9 : सुधा, नीना, आय्यासामीला रौप्य; सायनाला कांस्यपदक
Just Now!
X