News Flash

मराठमोळा प्रवीण तांबे गाजवतोय CPL, थरारक कॅच आणि भेदक मारा…पाहा हा व्हिडीओ

संघाच्या विजयात प्रवीणचा मोलाचा वाटा

Age us just a Number ही इंग्रजीमधली म्हण मुंबईकर खेळाडू प्रवीण तांबेला अगदी तंतोतंत लागू पडते आहे. प्रवीण सध्या कॅरेबिअन प्रिमीअर लिग स्पर्धेत खेळतो आहे. CPL मधला वयाने सर्वात मोठा खेळाडू…प्रवीण तांबे त्रिंबागो नाईट रायडर्स संघाचं प्रतिनिधीत्व करतो आहे.

६ सप्टेंबर रोजी Trinbago Knight Riders विरुद्ध St Kitts and Nevis Patriots या सामन्यात प्रवीणला संघात स्थान देण्यात आलं होतं. या सामन्यात एक बळी आणि थरारक कॅच पकडत प्रवीण तांबेने पुन्हा एकदा आपण या वयातही तितक्याच जोशाने क्रिकेट खेळू शकतो हे सिद्ध केलं. सातव्या षटकात प्रवीण तांबेने St Kitts and Nevis Patriots च्या बेन डंकचा थरारक झेल टिपला. यानंतर जोशुवा डी-सिव्लाचा बळी घेत प्रवीणने आपल्या संघाला आणखी एक यश मिळवून दिलं.

नाईट रायडर्स संघाने आपला विजयी रथ कायम ठेवत St Kitts and Nevis Patriots संघावर ९ गडी राखून मात केली. कायरन पोलार्डच्या Trinbago Knight Riders संघाने उपांत्य फेरीत आपलं स्थान पक्क केलं असून पहिल्या उपांत्य सामन्यात त्यांची गाठ Jamaica Tallawahs संघाशी पडणार आहे.

अवश्य वाचा – Video : याला म्हणतात नशीब ! बेल पडूनही आंद्रे रसेलला जीवदान…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 7, 2020 8:49 pm

Web Title: cpl 2020 48 year old pravin tambe takes a screamer to dismiss ben dunk psd 91
Next Stories
1 Eng vs Aus : Bio Security Bubble मोडल्यामुळे जोस बटलर अखेरच्या टी-२० ला मुकणार
2 Thomas Uber Cup : सायना नेहवालकडे भारतीय संघाचं नेतृत्व
3 VIDEO: चेंडू सोडून स्टंपवरच मारली बॅट; पाहून तुम्हालाही येईल हसू
Just Now!
X