वेस्ट इंडिजमध्ये कॅरेबियन प्रिमिअर लीग २०२१ स्पर्धा सुरु आहे. सेंट लूसिया किंग्स विरुद्ध ट्रिनबागो नाइट रायडर्स या सामन्यात किरोन पोलार्डने पंचांच्या एका निर्णयावर नाराजी व्यक्त केली. तसेच नाराजी व्यक्त करण्याचा त्याचा वेगळा अंदाज मैदानात पाहायला मिळाला. किरोन पोलार्ड ट्रिनबागो नाइट रायडर्सचा कर्णधार आहे. टी २० मध्ये पोलार्डच्या आक्रमक खेळीसोबत त्याची मैदानातील वागणं अनेकदा लक्ष वेधून घेतलं. सेंट लूसिया किंग्सच्या वेगवान गोलंदाज वहाब रियाजने वाइड लाइनच्या बाहेर चेंडू टाकला. मात्र पंचांनी हा चेंडू वाइड दिला नाही. यावर सीफर्ट कॉलने नाराजी व्यक्त वाइड नाही का? असा प्रश्न इशाऱ्याने विचारला. त्यानंतर पोलार्डलाही पंचाच्या निर्णयाचा राग आला.

सेंट लूसिया किंग्सकडून वाहब रियाजला १९ षटक सोपवण्यात आलं होतं. त्या षटकातील पाच चेंडू त्याने टाकला त्या चेंडूवर वाद झाला. पंचांनी हा चेंडू वाइड नसल्याचं सांगितलं. नॉन स्ट्राइकवर असलेल्या पोलार्डने यावर राग व्यक्त करत तसेच पंचांपासून दूर जाऊन उभा राहिला. यावेळी स्ट्राइकवर टीम सिफर्ट फलंदाजी करत होता. पोलार्ड मैदानातील ३० यार्डच्या रेषेवर जाऊन उभा राहिला.

आयपीएलमध्येही पोलार्डने अनेकदा असं केलेलं पाहिलं आहे. आयपीएलमध्ये तोंडाला पट्टी लावणं असो, किंवा बॅकवर्ड पॉइंट आणि मिड-ऑनवरून जोरजोरात ओरडणं असो. पोलार्ड आपल्या संघाविरोधात निर्णय आल्यास नाराजी व्यक्त करताना दिसतो.