मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर इंग्लंडविरुद्धच्या सराव सामन्यात महेंद्रसिंग धोनी कर्णधारपदाचा आपला अखेरचा सामना खेळत आहे. भारतीय संघाच्या या आतापर्यंतच्या सर्वात यशस्वी कर्णधाराचे देशात प्रचंड चाहते आहेत. धोनीची भेट घेण्यासाठी, त्याची स्वाक्षरी घेण्यासाठी चाहते नेहमी उत्सुक असतात. ब्रेबॉर्न स्टेडियमवर सुरू असलेल्या सामन्यात धोनीच्या अशाच एका चाहत्याने सुरक्षेची तमा न बाळगता थेट खेळपट्टीवर धाव घेतली.

भारतीय संघ येत्या १५ जानेवारीपासून इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळणार आहे. पण या मालिकेत धोनीऐवजी कोहली संघाचा कर्णधार म्हणून कामगिरी बजावणार आहे. या मालिकेआधीच्या  सराव सामन्यात मात्र धोनी संघाचे नेतृत्त्व करत आहे. धोनीचा कर्णधारपदाच्या कारकिर्दीचा हा अखेरचा सामना आहे. सराव सामना असूनही धोनीचे असंख्य चाहते स्टेडियमवर उपस्थित आहेत. धोनी फलंदाजीसाठी मैदानात येताच संपूर्ण स्टेडियमवर धोनीच्या नावाचा जयघोष सुरू झाला. सामन्याच्या ४६ व्या षटकात तर एक चाहता सीमा रेषा ओलांडून सुरक्षा भेदून थेट खेळपट्टीच्या दिशेने धावत गेला आणि धोनीसमोर नतमस्तक झाला. स्टेडियमच्या सुरक्षा रक्षकांनी त्वरित या चाहत्याला ताब्यात घेऊन मैदानाच्या बाहेरच्या रस्ता दाखवला.

IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: लवकरच सगळेजण हार्दिक पंड्याचे गोडवे गातील; कायरॉन पोलार्ड हार्दिकच्या मागे भक्कम उभा
Shikhar Dhawan's Shoulder Injury Updates in Marathi
Punjab Kings : राजस्थानविरुद्धच्या पराभवानंतर पंजाबला दुसरा धक्का, शिखर धवन पुढील काही सामन्यांना मुकणार
Lucknow beat Gujarat by 33 runs in IPL 2024
LSG vs GT : लखनऊविरुद्धच्या पराभवानंतर शुबमन गिल संतापला; कोणावर फोडले खापर? घ्या जाणून
Rohit Sharma takes over, sends Hardik Pandya to the boundary in iconic role-reversal as MI captain feels SRH's wrath
VIDEO : हैदराबादच्या ‘रन’ धुमाळीसमोर हार्दिकने पत्करली शरणागती, रोहितने मुंबईचे नेतृत्व करताना पाठवले सीमारेषेवर

VIDEO: कर्णधारपदाच्या अखेरच्या सामन्यात धोनीचा सत्कार

 

दरम्यान, धोनीने या सामन्यात आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करत ४० चेंडूत नाबाद ६८ धावांची खेळी साकारली आहे. भारतीय संघाने इंग्लंडसमोर ३०५ धावांचा डोंगर उभारला आहे. रायडूने सामन्यात दमदार शतकी कामगिरी केली, तर युवराजने अर्धशतकी खेळी साकारली. धोनी मैदानात दाखल होताच संपूर्ण स्टेडियमवर एकच कल्ला सुरू झाला. तब्बल २० हजारांहून अधिक प्रेक्षक यावेळी स्टेडियमवर उपस्थित होते. धोनीच्या नावाचा जयघोष संपूर्ण स्टेडियमवर सुरू असून धोनीनेही चाहत्यांना निराश न करता जोरदार फटकेबाजी केली. उत्तुंग षटकार ठोकून मोठ्या दिमाखात धोनीने अर्धशतक पूर्ण केले, तर त्यानंतरही फटकेबाजी सुरू ठेवून नाबाद ६८ धावांची खेळी साकारली.

वाचा: धोनीसारखे यश मोजक्याच कर्णधारांना- युवराज सिंग