News Flash

रोहित शर्माच्या यशाचे श्रेय महेंद्रसिंग धोनीला दिले पाहिजे; प्रशिक्षक दिनेश लाड यांचा खुलासा

प्रशिक्षक दिनेश लाड यांनी भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज फलंदाज आणि उपकर्णधार रोहित शर्माच्या कारकीर्दीविषयी मोठा खुलासा केला आहे

रोहित शर्माच्या यशाचे श्रेय महेंद्रसिंग धोनीला दिले पाहिजे; प्रशिक्षक दिनेश लाड यांचा खूलासा

प्रशिक्षक दिनेश लाड यांनी भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज फलंदाज आणि उपकर्णधार रोहित शर्माच्या कारकीर्दीविषयी मोठा खुलासा केला आहे. दिनेश लाड यांनी रोहित शर्माच्या यशाचे श्रेय महेंद्रसिंग धोनीला दिले पाहिजे, असे म्हटले आहे.  एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी रोहित शर्माबाबत अनेक खुलासे केले आहेत.

दिनेश लाड म्हणाले, “एक वेळ अशी होती की २००९ ते २०११ दरम्यान रोहित शर्माने क्रिकेटला वेळ दिला नाही. त्यामुळे त्याचा खेळ खराब झाला. त्याचा आत्मविश्वास देखील डगमगला होता. त्यावेळी मी त्याला तुझी ओळख क्रीकेटमुळे आहे. सरावावर लक्ष दे, नाहितर लोकं तुला विसरून जातील, असे सांगितले. त्यानंतर रोहितने खेळावर लक्ष दिले.”

गेल्या काही वर्षांत रोहित शर्माची कारकीर्द खूप बदलली आहे. सन २०१३ पासून तो एकदिवसीय आणि टी २० क्रिकेटचा सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून उदयास आला, त्यानंतर २०१९ पासून कसोटी क्रिकेटमध्येही त्याने वर्चस्व राखले. प्रशिक्षक दिनेश लाड म्हणाले की, रोहित सुरुवातीपासूनच अशी फलंदाजी करायचा परंतु २०११ मध्ये निवड न झाल्यामुळे तो खूप दु: खी झाला होता, कारण विराट कोहली त्याच्यानंतर खेळू लागला आणि तो कर्णधार होता.

हेही वाचा…म्हणून आर अश्विनला सहा महिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर ठेवण्यात आलं; सईद अजमलचा दावा

मात्र, योग्य मार्गदर्शनामुळे रोहितचा खेळ चांगला होता. २०११ पासून त्याचा खेळ सुधारत आहे पण सर्व प्रथम मला त्याच्या यशाचे श्रेय एमएस धोनीला द्यायचे आहे. एमएस धोनीने रोहितवर विश्वास ठेवला आणि त्याला संधी दिली, असे दिनेश लाड म्हणाले.

रोहितच्या कारकीर्दीत मुंबई इंडियन्स संघाच्या भूमिकेचे वर्णन करताना दिनेश लाड म्हणाले की, जेव्हापासून रोहितला मुंबईची कमान मिळाली तेव्हापासून त्याने स्वत: ला एक मोठा खेळाडू म्हणून पाहण्यास सुरुवात केली. तो स्वतः आधी संघाचा विचार करत असे. त्यामुळे त्याच्या व्यक्तिमत्त्वातही बरीच सुधारणा झाली आणि त्याचा चांगला परिणाम खेळावर झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 15, 2021 10:08 am

Web Title: credit for rohit sharma success should give to m s dhoni says coach dinesh lad srk 94
Next Stories
1 …म्हणून आर अश्विनला सहा महिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर ठेवण्यात आलं; सईद अजमलचा दावा
2 EURO CUP 2020 : गोलशून्य बरोबरीत सुटला स्पेन विरुद्ध स्वीडन सामना
3 जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा : भारताने आव्हानांना सामोरे जाणे महत्त्वाचे!
Just Now!
X