आंध्रप्रदेशचा आंतरराष्ट्रीय मास्टर सी. आर. जी. कृष्णाने नऊपैकी आठ गुण घेत येथे आयोजित फिडे मानांकन बुध्दिबळ स्पर्धेचे विजेतेपद मिळविले. उपविजेतेपद आंतरराष्ट्रीय मास्टर अनूप देशमुखने पटकावले.अखिल भारतीय बुध्दिबळ महासंघ, महाराष्ट्र बुध्दिबळ संघटना यांच्या मान्यतेने येथील रेषा मल्टिअॅक्टिव्हिटी सेंटर यांच्या वतीने आयोजित या स्पर्धेतील विजेते कृष्णा यांना ५१ हजार तर, नऊपैकी साडेसात गुण मिळविणाऱ्या देशमुख यांना ३१ हजार रूपयांचा धनादेश देण्यात आला.गणेश ताजणेने १७०० यलो गुणांखालील गटात पाच हजार रूपयांसह तृतीय क्रमांक मिळविला. वेदांत पिंपळखरेने संपूर्ण स्पर्धेत १४ वा तर, जिगर ठक्करने १५ वा क्रमांक प्राप्त केला. नाशिकच्या खेळाडुंना पहिल्या पाचमध्ये स्थान मिळाले नसले तरी अनुभवाच्या दृष्टिने त्यांना या स्पर्धेचा भविष्यात नक्कीच लाभ होईल, असा विश्वास मुख्य संयोजक अर्चना कुलकर्णी यांनी व्यक्त केला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 31, 2015 12:43 pm