क्रिकेट ऑस्ट्रेलियाने जाहीर केलेल्या दशकातील सर्वोत्तम वन-डे आणि कसोटी संघामध्ये भारतीय खेळाडूंचा वरचष्मा पहायला मिळतो आहे. कसोटी संघाचं कर्णधारपद विराट कोहलीकडे तर वन-डे संघाचं कर्णधारपद माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीकडे सोपवण्यात आलेलं आहे. २०१९ वर्षात भारतीय संघाने विंडीजविरुद्ध कटकच्या मैदानावर आपला अखेरचा वन-डे सामना खेळला. विंडीजविरुद्धची टी-२० आणि वन-डे मालिका भारताने २-१ च्या फरकाने जिंकत सरत्या वर्षाला विजयी निरोप दिला.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा दशकातला सर्वोत्तम वन-डे संघ –

महेंद्रसिंह धोनी (कर्णधार व यष्टीरक्षक), रोहित शर्मा, हाशिम आमला, विराट कोहली, एबी डिव्हीलियर्स, शाकीब अल-हसन, जोस बटलर, राशिद खान, मिचेल स्टार्क, ट्रेंट बोल्ट आणि लसिथ मलिंगा

क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा दशकातला सर्वोत्तम कसोटी संघ –

अ‍ॅलिस्टर कुक, डेव्हिड वॉर्नर, केन विल्यमसन, स्टिव्ह स्मिथ, विराट कोहली (कर्णधार), एबी डिव्हीलियर्स (यष्टीरक्षक), बेन स्टोक्स, डेल स्टेन, नॅथन लॉयन, जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड

महत्वाची गोष्ट म्हणने वन-डे संघात मिचेल स्टार्कचा अपवाद वगळता एकाही ऑस्ट्रेलियन खेळाडूंना संधी मिळालेली नाही. २०२० साली जानेवारी महिन्यात भारत घरच्या मैदानावर श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध मर्यादीत षटकांची मालिका खेळणार आहे. यानंतर भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना होईल.