करोना विषाणूचा सामना करण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनचा फटका क्रिकेट जगतालाही बसला होता. गेल्या दोन महिन्यापासून एकही आंतरराष्ट्रीय सामना अद्याप खेळवण्यात आलेला नाही. मात्र स्पर्धा रद्द होत असल्यामुळे होणारं आर्थिक नुकसान भरुन काढण्यासाठी आयसीसीने आता पावलं उचलायला सुरुवात केली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने वर्षाअखेरीस भारताविरुद्ध कसोटी मालिकेचं वेळापत्रक जाहीर केलं.

२०२०-२१ सालासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपलं सुधारित वेळापत्रक जाहीर केलं, ज्यात भारताविरुद्ध टी-२० आणि वन-डे मालिकेच्या तारखाही जाहीर करण्यात आलेल्या आहेत. असा असेल भारतीय संघाचा ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा कार्यक्रम –

टी-२० मालिका –

  • पहिला टी-२० सामना, ११ ऑक्टोबर – ब्रिस्बेन
  • दुसरा टी-२० सामना, १४ ऑक्टोबर – कॅनबेरा
  • तिसरा टी-२० सामना, १७ ऑक्टोबर – अ‍ॅडलेड

 

कसोटी मालिका –

  • पहिली कसोटी, ३ डिसेंबर – ब्रिस्बेन
  • दुसरी कसोटी, ११ डिसेंबर – अ‍ॅडलेड
  • तिसरी कसोटी, २६ डिसेंबर – मेलबर्न
  • चौथी कसोटी, ३ जानेवारी – सिडनी

 

वन-डे मालिका –

  • पहिला वन-डे सामना, १२ जानेवारी २०२१ – पर्थ
  • दुसरा वन-डे सामना, १५ जानेवारी, २०२१ – मेलबर्न
  • तिसरा वन-डे सामना, १७ जानेवारी २०२१ – सिडनी