News Flash

बहुचर्चित अ‍ॅशेस मालिकेची घोषणा, तब्बल २६ वर्षानंतर होणार ‘मोठा’ बदल

''अ‍ॅशेस मालिका प्रेक्षकांना मैदानावर आणेल''

अ‍ॅशेस मालिका

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान होणाऱ्या बहुचर्चित अ‍ॅशेस मालिकेचे वेळापत्रक क्रिकेट ऑस्ट्रेलियाने जाहीर केले आहे. अ‍ॅशेस मालिका ८ डिसेंबरपासून सुरू होईल आणि पहिला सामना ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर खेळला जाईल. त्याशिवाय २६ वर्षांत प्रथमच अंतिम सामना सिडनीऐवजी पर्थ येथे खेळला जाईल. यावेळी मालिकेचा चौथा सामना सिडनी क्रिकेट मैदानावर तर अंतिम सामना पर्थ येथे होईल. अ‍ॅशेस मालिकेचे सामने पर्थ, ब्रिस्बेन, अ‍ॅडलेड, मेलबर्न आणि सिडनी येथे होतील.

अ‍ॅशेस मालिकेपूर्वी अफगाणिस्तान संघ ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर येईल. दोन्ही संघांमधील एकमेव कसोटी सामना २७ नोव्हेंबरपासून खेळला जाणार आहे. अफगाणिस्तानला कसोटीचा दर्जा मिळाल्यानंतर ऑस्ट्रेलिया प्रथमच अफगाणिस्तानविरुद्ध खेळेल.

 

या वर्षाच्या अखेरीस होणारी अ‍ॅशेस मालिका प्रेक्षकांना मैदानावर आणेल अशी अपेक्षा क्रिकेट ऑस्ट्रेलियाने व्यक्त केली आहे. तथापि, इतर देशांकडून येणाऱ्या समर्थकांच्या निर्णयाबाबत सरकारच्या सल्ल्याचे ते पालन करतील, असे मंडळाने सांगितले. ऑस्ट्रेलिया क्रिकेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी निक हॉकले म्हणाले ”अ‍ॅशेसचे आयोजन करण्यासाठी आम्ही उत्साहित आहोत. शेवटची अ‍ॅशेस मालिका एक विलक्षण होती, तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते आणि मला आशा आहे की यावेळीही असेच होईल. यावेळी आम्ही संघांच्या प्रवासासाठी आणि इतर सर्व गोष्टींसाठी सरकारच्या नियमांचे पालन करू.”

अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी आणि अ‍ॅशेस मालिकेनंतर ऑस्ट्रेलियाचा संघ न्युझीलंड आणि श्रीलंका विरुद्ध टी-२० आणि एकदिवसीय सामने खेळणार आहे. कांगारूंचा संघ न्यूझीलंड विरुद्ध तीन एकदिवसीय सामने आणि एक टी-२० सामना खेळेल, तर श्रीलंकेविरुद्ध पाच टी-२० सामन्यांची मालिका त्यांना खेळायची आहे.

अ‍ॅशेस २०२१-२२चे वेळापत्रक

  • पहिली कसोटी – गाबा, ब्रिस्बेन (८ ते १२ डिसेंबर, २०२१)
  • दुसरी कसोटी – अ‍ॅडलेड ओव्हल, डे-नाईट (१६ ते २० डिसेंबर २०२१)
  • तिसरी कसोटी – मेलबर्न (२६ ते ३० डिसेंबर २०२१)
  • चौथी कसोटी – सिडनी (५ ते ९ जानेवारी २०२२)
  • पाचवी कसोटी – पर्थ (१४ ते १८ जानेवारी २०२२)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2021 1:14 pm

Web Title: cricket australia announces ashes 2021 22 schedule adn 96
Next Stories
1 दिल्ली कॅपिटल्सच्या ‘स्टार’ खेळाडूची करोनावर मात
2 बॉल टेम्परिंग प्रकरण : गोलंदाजांनी दिलेल्या स्पष्टीकरणाशी क्लार्क असहमत
3 आगामी महत्त्वाच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर
Just Now!
X