भारतीय संघाच्या आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने कसोटी संघाची घोषणा केली आहे. अपेक्षेप्रमाणे टीम पेनकडे ऑस्ट्रेलियाच्या संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलेलं असून, युवा विल पुकोव्सकी आणि कॅमरुन ग्रिन यांना ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघात स्थान देण्यात आलं आहे.

अवश्य पाहा – टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी सज्ज

करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि Bio Secure Bubble चे नियम लक्षात ठेवत क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या निवड समितीने १७ सदस्यांना संघात स्थान दिलं आहे. असा असेल ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघ –

टीम पेन (कर्णधार व यष्टीरक्षक), सिन अबॉट, जो बर्न्स, पॅट कमिन्स, कॅमरुन ग्रिन, जोश हेजलवुड, ट्रॅविस हेड, मार्नस लाबुशेन, नॅथन लॉयन, मायकल नेसर, जेम्स पॅटिन्सन, विल पुकोव्सकी, स्टिव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मिचेल स्वेप्सन, मॅथ्य वेड, डेव्हिड वॉर्नर</p>

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेचा कार्यक्रम –

  • पहिला कसोटी सामना – १७ ते २१ डिसेंबर – अ‍ॅडलेड (दिवस-रात्र)
  • दुसरा कसोटी सामना – २६ ते ३० डिसेंबर – मेलबर्न
  • तिसरा कसोटी सामना – ७ ते ११ जानेवारी २०२१ – सिडनी
  • चौथा कसोटी सामना – १५ ते १९ जानेवारी – गॅबा