10 July 2020

News Flash

पराभवाच्या भीतीमुळे भारत दिवस-रात्र कसोटी खेळत नाही : क्रिकेट ऑस्ट्रेलिया

दिवस-रात्र कसोटी सामन्याला बीसीसीआयचा नकार, भारताच्या आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधीच दोन्ही देशांच्या क्रिकेट बोर्डांमध्ये चांगलीच जुंपली आहे.

भारताला ऑस्ट्रेलियामध्ये येऊन आम्हाला कोणत्याही परिस्थितीत हरवायचं आहे, म्हणूनच बीसीसीआय दिवस-रात्र कसोटी सामना खेळण्यास नकार देत आहे, असं क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे प्रमुख जेम्स सदरलँड म्हणाले आहेत. भारतीय संघ या वर्षअखेरीस ऑस्ट्रेलिया दौ-यावर जाणार आहे. दरम्यान, भारतीय संघाने अॅडीलेड येथील दिवस-रात्र कसोटी सामना खेळण्यास नकार दर्शवल्यामुळे, क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे प्रमुख जेम्स सदरलँड नाराज आहेत.

यजमान देशांना कसोटी सामना कसा खेळवायचा याचा अधिकार असायला हवा असं माझं खासगी मत आहे असं सूचक वक्तव्य सदरलॅंड यांनी ऑस्ट्रेलियातील स्थानिक रेडीओ चॅनलला दिलेल्या मुलाखतीत केलं आहे. यासंबंधी वृत्तसंस्था पीटीआयने बीसीसीआय सीओए प्रमुख विनोद राय यांच्याशी संपर्क साधला असता, ‘मला वाटत नाही की बीसीसीआयचा विचार बदलेल, कारण केवळ प्रथमश्रेणी सामने दिवस-रात्र ( गुलाबी चेंडू) होतील असं आम्ही आधीच ठरवलं आहे’ असं राय म्हणाले.

काय म्हणाले सदरलॅंड – 

“ भारताला दिवस-रात्र कसोटी क्रिकेट जगवण्याऐवजी मालिका जिंकण अधिक महत्वाचं आहे. त्यांना ऑस्ट्रेलियात येऊन आम्हाला हरवायचं आहे. आतापर्यंत ऑस्ट्रेलियात झालेल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यांमध्ये गुलाबी चेंडूवर आमचा संघ यशस्वी झालेला आहे. त्यामुळे गुलाबी चेंडूवर क्रिकेट खेळल्यास ऑस्ट्रेलियाला फायदा होईल हा विचार मनात घेऊन बीसीसीआय दिवस-रात्र कसोटी सामना खेळण्यास नकार देत आहे”, असं सदरलॅंड म्हणाले.

२१ नोव्हेंबर ते १९ जानेवारीदरम्यान भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार असून, या दौऱ्यात भारतीय संघ ३ टी-२०, ४ कसोटी आणि ३ वन-डे सामने खेळणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2018 3:21 pm

Web Title: cricket australia ca says india reluctant about day night test to avoid loss
Next Stories
1 चुका सर्वांकडून होतात, स्मिथ-वॉर्नर पुनरागमन करतील – जस्टीन लँगर
2 ‘ग्रास कोर्टचा राजा’ परततोय; ‘स्टुगार्ट ओपन’मधून फेडरर करणार पुनरागमन
3 ऑस्ट्रेलिया संघाला मिळाला नवा प्रशिक्षक, माजी दिग्गज खेळाडूची लागली वर्णी
Just Now!
X