News Flash

क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या CEO चा तडकाफडकी राजीनामा

'करोना'काळात ८० टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा घेतला होता निर्णय

क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या CEO चा तडकाफडकी राजीनामा
केविन रॉबर्ट्स (सौजन्य - क्रिकेट ऑस्ट्रेलिया ट्विटर)

क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) केविन रॉबर्ट्स यांनी मंगळवारी तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा दिला. क्रिकेट ऑस्ट्रेलिया करोना व्हायरसच्या काळात आर्थिक संकटाशी झुंज देत आहे. अशा परिस्थितीत ८० टक्के कर्मचार्‍यांना कामावरुन कमी करण्याचा निर्णय रॉबर्ट्स यांनी घेतला होता. त्यावरून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीकाही झाली होती.

रॉबर्ट्स यांनी राजीनामा दिल्याची बातमी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून दिली. त्यांनी क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडे सुपूर्द केलेला राजीनामा तत्काळ प्रभावाने मंजूरदेखील करण्यात आला. रॉबर्ट्स यांच्या जागी, सध्या T20 World Cup स्पर्धेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी असलेल्या निक हॉकले यांची हंगामी नियुक्ती करण्यात आली आहे. २०१८ साली जेम्स सदरलँड यांच्या जागी रॉबर्ट्स यांची मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती झाली होती. त्यांचा करार पुढील वर्षी संपणार होता, पण त्याआधीच त्यानी अचानक राजीनामा दिला.

राजीनामा दिल्यानंतर रॉबर्ट्स यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. “मला या खेळाबद्दल आदर आहे. मंडळात मला इतके मोठे स्थान भूषवण्याची संधी मिळाली, त्यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो. मला क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे सीईओ कायमच पसंत होते, मी त्यावर असताना शक्य तितके चांगले काम करण्याचा प्रयत्न केला. आमचे खेळाडू आणि कर्मचारी सर्वच खूप चांगले आहेत. त्यांनी या खेळासाठी उल्लेखनीय कार्य केले आहे. आपल्या सर्वांच्या साथीने काम करत जे आपण मिळवले त्याचा मला अभिमान आहे. ज्यांनी मला सहकार्य केले, त्यांचा मनापासून आभारी आहे”, असे ते म्हणाले.

दरम्यान, यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया टी-२० विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करणार आहे. यानंतर भारत ४ कसोटी आणि ३ एकदिवसीय सामन्यांची मालिकादेखील खेळणार आहे. जर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर गेला नाही, तर क्रिकेट ऑस्ट्रेलियाला सुमारे २,४०० कोटींचे नुकसान सहन करावे लागणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2020 12:54 pm

Web Title: cricket australia chief executive kevin roberts resigns amid covid 19 and financial crisis vjb 91
Next Stories
1 “विराटला जमणारी ‘ती’ एक गोष्ट रोहित-गेल-डीव्हिलियर्सला येत नाही”
2 T20 World Cup भरवणं यंदाच्या वर्षात अशक्य!; क्रिकेट ऑस्ट्रेलियाची कबुली
3 यंदा दुलीप, हजारे, देवधर स्पर्धा रद्द करा!
Just Now!
X