भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अॅडलेड कसोटी सामना दिवस-रात्र पद्धतीने खेळण्यास स्पष्टपणे नकार दिल्यानंतर आता क्रिकेट ऑस्ट्रेलियाही नरमलं आहे. बीसीसीआयचे हंगामी सचिव अमिताभ चौधरी यांनी क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे प्रमुख जेम्स सदरलँड यांना इ-मेल करत दिवस-रात्र कसोटी सामना खेळण्यासाठी बीसीसीआय तयार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. बीसीसीआयच्या या भूमिकेनंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियानेही अॅडलेड कसोटी सामना पारंपरिक पद्धतीने खेळण्यासाठी मान्य केलं आहे.

आयसीसीच्या नवीन नियमांनुसार, दोन देशांच्या सहमतीनंतर दिवस-रात्र कसोटी सामना खेळवण्यात येईल. आतापर्यंत घरच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाने चांगली कामगिरी केली आहे. घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाचा संघ एकही दिवस-रात्र कसोटी सामना हरलेला नाहीये. त्यामुळे भारताच्या दौऱ्यात क्रिकेट ऑस्ट्रेलिया अॅडलेड कसोटी दिवस-रात्र पद्धतीने खेळवण्यासाठी उत्सुक होतं. मात्र भारतीय संघातील खेळाडू आणि बीसीसीआयच्या ठाम भूमिकेसमोर अखेर क्रिकेट ऑस्ट्रेलियाला नमतं घ्यावं लागलं आहे.

अवश्य वाचा – भारत दिवस-रात्र कसोटी सामना खेळणार नाही, बीसीसीआयचं क्रिकेट ऑस्ट्रेलियाला पत्र