मुंबईत सोमवारी होणाऱ्या राष्ट्रीय निवड समितीच्या बैठकीनंतर आगामी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठीचा भारतीय संघ जाहीर करण्यात येणार आहे. असे असतानाच तिकडे ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने १५ खेळाडूंचा समावेश असणाऱ्या संघाची विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी घोषणा केली. इंग्लंडमध्ये ३० मेपासून सुरू होणाऱ्या विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाने निवड केलेल्या संघामधून पीटर हँड्सकाँब आणि जोश हेझलवूडला डच्चू देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. चेंडूशी छेडछाड केल्याप्रकरणी घालण्यात आलेली बंदी उठवण्यात आल्यानंतर स्टीव्हन स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांचा संघात समावेश करण्यात आला आहे.

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठीचा ऑस्ट्रेलियन संघ खालीलप्रमाणे

अॅरॉन फिंच (कर्णधार)
जेसन बेहरनडॉर्फ<br />अॅलेक्स केरी (यष्टीरक्षक)
नॅथन कुल्टर-नाइल
पॅट कमिन्स
उस्मान ख्वाजा
नेथन लॉयन
शॉन मार्श
ग्लेन मॅक्सवेल<br />झाय रिचर्डसन<br />स्टीव्ह स्मिथ
मिचेल स्टार्क
मार्कस स्टॉयनिस
डेव्हिड वॉर्नर
अॅडम झॅम्पा

आज भारतीय संघाचीही घोषणा होणार असून संघातील १३ खेळाडू जवळपास निश्चित मानले जात आहे. उर्वरित दोन स्थानांसाठी राखीव यष्टीरक्षक, चौथ्या क्रमांकाचा फलंदाज, अष्टपैलू फिरकी गोलंदाज आणि अतिरिक्त वेगवान गोलंदाज असे चार पर्याय उपलब्ध आहेत. आज दुपारी राष्ट्रीय निवड समितीच्या बैठकीनंतर संघाची घोषणा होईल.