02 July 2020

News Flash

क्रिकेट प्रशिक्षकाचा अपघाती मृत्यू

पंजाबमधील मोगा-लुधियाना मार्गावर मोहाली येथील क्रिकेट प्रशिक्षक हरविंदर सिंग यांचा कार अपघातात मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरविंदर सिंग आणि त्यांची पत्नी आपल्या कारमधून

| June 20, 2013 01:24 am

पंजाबमधील मोगा-लुधियाना मार्गावर मोहाली येथील क्रिकेट प्रशिक्षक हरविंदर सिंग यांचा कार अपघातात मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरविंदर सिंग आणि त्यांची पत्नी आपल्या कारमधून मोगा-लुधियाना मार्गावरुन आपल्या गावी जात असताना मटवानी गावाजवळ एका बसचालकाने त्यांच्या कारला धडक दिली. यामध्ये हरविंदर यांची पत्नी गंभीररित्या जखमी झाली असून हरविंदर सिंग यांचा मृत्यू झाला आहे.
अपघात घडवून आणणारा बस चालक फरार झाला असून पुढील तपास सुरू असल्याचेही पोलिसांनी सांगितले.
२८ वर्षीय हरविंदर सिंग मोहाली येथील एका स्थानिक क्रिकेट संघाचे प्रशिक्षक आहेत.

 

(संग्रहित छायाचित्र)

  

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 20, 2013 1:24 am

Web Title: cricket coach dies in mishap
Next Stories
1 राष्ट्रीय सायकलिंग प्रशिक्षिकेचा सरावादरम्यान अपघाती मृत्यू
2 आनंदसाठी धोक्याचा इशारा
3 भारतीय महिला हॉकी संघ पराभूत; उपांत्य फेरीच्या आशा मावळल्या
Just Now!
X