परस्पर हितसंबंधांचे उच्चाटन करण्यासाठी बीसीसीआय प्रयत्नशील
परस्पर हितसंबंध जपले जाऊ नयेत आणि क्रिकेटची प्रतिमा स्वच्छ व्हावी, यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) कडक धोरण अवलंबले आहे. यासाठी बीसीसीआयने संलग्न संघटनांना पत्र लिहिले आहे. पण त्याचबरोबर काही माजी क्रिकेटपटूही परस्पर हितसंबंध जपत असल्याचे बीसीसीआयच्या निदर्शनास आले आहे. यामध्ये सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, अनिल कुंबळे, सौरव गांगुली, व्ही. व्ही. एस. लक्ष्मण, संजय बांगर रवी शास्त्री आणि ब्रिजेश पटेल या माजी क्रिकेटपटूंचा समावेश आहे.
खेळाडू आणि त्यांचे हितसंबंध पुढील प्रमाणे
अनिल कुंबळे : बीसीसीआयच्या तांत्रिक समितीचा अध्यक्ष, मुंबई इंडियन्स संघाचा मार्गदर्शक आणि टेन्विक या खेळाडूंना मार्गदर्शन करणाऱ्या कंपनीचा सह संस्थापक.
ब्रिजेश पटेल : बीसीसीआयच्या नव्या विकास समितीचे अध्यक्ष, कर्नाटक क्रिकेट असोसिएशनचे सचिव, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाच्या क्रिकेट ऑपरेशन समितीचे अध्यक्ष.
रवी शास्त्री : भारतीय संघाचे संचालक. बीसीसीआयचे करारबद्ध समालोचक, आयपीएल संचालन समितीचे सदस्य.
सचिन तेंडुलकर : बीसीसीआयच्या क्रिकेट सुधार समितीचा सदस्य, मुंबई इंडियन्स संघाचा मार्गदर्शक.