क्रिकेटला Gentleman’s Game म्हटलं जातं. असे असले तरी गेल्या काही वर्षात अनेक खेळाडू आक्रमक होताना दिसत असून मैदानावर त्याचे भांडणात रूपांतर झालेले पाहायला मिळत आहे. मैदानावर स्लेजिंग करणं हा तर खेळाचाच एक भाग झाला असून अनेकदा या शाब्दिक युद्धात अनेक खेळाडू पातळी सोडून टीका करतानाही दिसले आहेत. पण एका क्रिकेट सामन्यात खेळाडूने चक्क पंचांच्या डोक्यात लाथ मारल्याची घटना घडली आहे.
न्यूझीलंडमधील होरोवहेनुआ कपिती येथे क्लब क्रिकेट सामना सुरु होता. पारापारौमु आणि वेरारोआ या दोन संघात हा सामना रंगला होता. या सामन्यात चौथ्या षटकात खिलाडूवृत्तीला काळिमा फासणारी एक घटना घडली. सुरुवातीला दोन संघातील खेळाडू यांच्यात वाद झाला. त्यानंतर पंचानी या भांडणात हस्तक्षेप केला. यावेळी चक्क एका खेळाडूने रागाच्या भरात पंचांच्या डोक्यात लाथ मारली. या खेळाडूने पंचांच्या डोक्यात तीन वेळा लाथ मारल्यानंतर अखेर इतर खेळाडूंनी त्याला मागे खेचल्याचे समजत आहे.
दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांना बोलवण्यात आले. तसेच होरोवहेनुआ कपिती क्रिकेट संघटनेचे CEO यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत यातील संबंधित क्रिकेटपटूंवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल असे सांगितले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 19, 2019 2:18 pm