News Flash

अ‍ॅशेस कसोटी: इंग्लंड अवघ्या १३६ धावांत गारद

अ‍ॅशेस कसोटी मालिकेच्या पहिल्या सामनाच्या दुसऱया दिवशी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी भेदक मारा करत इंग्लंडच्या संघाला अवघ्या १३६ धावांत गारद केले आहे.

| November 22, 2013 12:10 pm

अ‍ॅशेस कसोटी मालिकेच्या पहिल्या सामनाच्या दुसऱया दिवशी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी भेदक मारा करत इंग्लंडच्या संघाला अवघ्या १३६ धावांत गारद केले आहे.
आज शुक्रवार ऑस्ट्रेलियाच्या २९५ धावांचा पाठलाग करत असताना इंग्लंडचा डाव अवघ्या १३६ धावांत आटोपला. इंग्लंडकडून मायकेल कॅरबेरीने ४० आणि स्टुअर्ट ब्रॉड ३२ धावा या दोघांना वगळता इतर कोणत्याही फलंदाजाला २० धावांच्या वर मजल मारता आली नाही.
आता इंग्लंडचा संघ १५९ धावांनी पछाडीवर आहे. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल जॉन्सनने सर्वाधिक ४ तर, हॅरिसने ३, नॅथन लियॉनने २ तर पीटर सिडलने १ बळी मिळविला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2013 12:10 pm

Web Title: cricket england all out for 136 in 1st ashes test
टॅग : England
Next Stories
1 ‘रिचर्ड्स यांच्या विक्रमाशी बरोबरी साधल्याचा आनंद पण, अजून भरपूर खेळायचे आहे’
2 वस्त्रहरण! भारताचा वेस्ट इंडिजवर सहा विकेट्स राखून विजय
3 कार्लसन आनंदला!
Just Now!
X