बम्र्युडा क्रिकेट सामन्यातील घटना; अँडरसनवर आजीवन बंदी
क्रिकेट हा सभ्य माणसांचा खेळ म्हणून प्रचलित आहे, परंतु गेल्या काही वर्षांचा इतिहास पाहता मैदानाबाहेर आणि मैदानावर या खेळातील सभ्यता कमी होताना दिसत आहे. बम्र्युडा येथील स्थानिक क्रिकेट सामन्यात विलॉव कट्स क्रिकेट क्लबचा फलंदाज जॉर्ज ओ’ब्रायनने क्लेव्हलँड काऊंटी क्रिकेट क्बलचा यष्टीरक्षक जेसन अँडरसनला चक्क बॅटने बडवले. या प्रकरणात अँडरसनला दोषी ठरवले आणि त्याच्यावर आजीवन, तर ओ’ब्रायनवर सहा महिन्यांची बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला.
चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स या स्पध्रेचा अंतिम सामना येथील सेंट डेव्हिड क्रिकेट क्बलवर खेळविण्यात येत होता. सामन्यादरम्यान यष्टीरक्षक अँडरसनने ओ’ब्रायनला टपली मारली. त्यानंतर या दोन्ही खेळाडूंमध्ये कुस्तीचा सामना रंगला. ब्रायनने बॅटने अँडरसनवर हल्ला चढवला. या दोघांमधील हा सामना सोडवण्यासाठी खेळाडूंसह सामनाधिकारी मैदानावर धावले.