News Flash

मुंबईच्या प्रशिक्षक पदांच्या मुलाखती उद्या

माजी वेगवान गोलंदाज सलिल अंकोला, माजी यष्टीरक्षक सुलक्षण कुलकर्णी हेसुद्धा प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

वरिष्ठ पुरुष संघासह अन्य प्रशिक्षकांच्या जागांसाठी प्राथमिक निवड झालेल्या व्यक्तींच्या मुलाखती बुधवारी क्रिकेट सुधारणा समितीकडून घेतल्या जाणार आहेत, अशी माहिती मुंबई क्रिकेट संघटनेने सोमवारी दिली.

‘‘बुधवारी सकाळी १०.३० वाजल्यापासून क्रिकेट सुधारणा समितीकडून विविध वयोगटांच्या संघांसाठी प्रशिक्षक पदांसाठी २४ जणांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत,’’ असे ‘एमसीए’कडून सांगण्यात आले. माजी वेगवान गोलंदाज सलिल अंकोला, माजी यष्टीरक्षक सुलक्षण कुलकर्णी हेसुद्धा प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत आहेत.

कुलकर्णीचे ‘एमसीए’कडे पत्र

वैद्यकीय सूचनेमुळे डिसेंबरच्या अखेपर्यंत क्रिकेट सुधारणा समितीच्या बैठकीला हजर राहू शकणार नाही, असे राजू कुलकर्णीने ‘एमसीए’ला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. ‘‘करोनाच्या कालखंडात माझ्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून डिसेंबपर्यंत मी घरीच थांबावे, असे निर्देश मला डॉक्टरांनी दिले आहेत. त्यामुळे माझ्या जागी अन्य व्यक्तीची निवड केल्यास हरकत नाही,’’ असे कुलकर्णीने स्पष्ट केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2020 12:17 am

Web Title: cricket mumbai coach interviews tomorrow abn 97
Next Stories
1 मराठमोळा प्रवीण तांबे गाजवतोय CPL, थरारक कॅच आणि भेदक मारा…पाहा हा व्हिडीओ
2 Eng vs Aus : Bio Security Bubble मोडल्यामुळे जोस बटलर अखेरच्या टी-२० ला मुकणार
3 Thomas Uber Cup : सायना नेहवालकडे भारतीय संघाचं नेतृत्व
Just Now!
X