29 May 2020

News Flash

करोनामुळे थांबलेल्या क्रिकेटचं अखेर मैदानावर ‘कमबॅक’

कॅरेबियन बेटांवर झाली धडाकेबाज सुरूवात

करोनाच्या तडाख्यामुळे सुमारे दोन महिने पूर्णपणे बंद असलेला क्रिकेटचा खेळ अखेर मैदानावर परतला. कॅरेबियन बेटांवर विन्सी प्रीमियर टी १० लीग स्पर्धेच्या माध्यमातून करोनाच्या हाहा:कारानंतरचा पहिला क्रिकेट सामना खेळला गेला. सॉल्ट पाँड ब्रेकर्स आणि ग्रेनेडिन डायवर्स या दोन संघांमध्ये हा सामना रंगला. त्यात सॉल्ट पाँड ब्रेकर्स संघाने विजय मिळवला. त्याचसोबत एकाच दिवसात लीग स्पर्धेत आणखी दोन सामनादेखील खेळवण्यात आले. दुसऱ्या डर्सन मलोनी याच्या १९ चेंडूत नाबाद ४१ धावांच्या खेळीच्या बळावर ला सोफ्रिअर हायकर्स संघाने विजय मिळवला. तर तिसऱ्या सामन्यात डार्क व्ह्यू एक्सप्लोरर्स संघ विजयी झाला.

विन्सी प्रीमियर टी १० लीग स्पर्धेत वेस्ट इंडिज संघातून खेळणाऱ्या अनेक खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. सॉल्ट पाँड ब्रेकर्स आणि ग्रेनेडिन डायवर्स या पहिल्या सामन्यात डायवर्स संघाने १० षटकात सर्वबाद ६८ धावा केल्या. ब्राउन (२४) आणि पीअर (१४) वगळता कोणताही फलंदाज दोन आकडी धावसंख्या गाठू शकला नाही. स्ट्रफने ३ बळी टिपले. ब्रेकर्स संघाने ६९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग ९.२ षटकात केला. त्यांनी ४ चेंडू आणि ३ गडी राखून सामना जिंकला. थॉमसने २० तर नेडने नाबाद १५ धावा केल्या.

विन्सी प्रीमियर टी १० लीग स्पर्धेतील दुसरा ला सोफ्रिअर हायकर्स आणि बोटॅनिक गार्डन्स रेंजर्स यांच्यात झाला. रेंजर्स संघाने १० षटकात ७० धावा केल्या. केजरिक विल्यम्सने सर्वाधिक १५ धावा केल्या, तर १३ धावा अंवातर मिळाल्या. हेवूडने १२ धावांत ३ बळी टिपले. ब्रेकर्स संघाने हे आव्हान अवघ्या ५.४ षटकांत पूर्ण केले. एसआर ब्राउन २२ धावांवर बाद झाला, पण डर्सन मलोनीने १९ चेंडूत नाबाद ४१ धावांची खेळी करत संघाला नऊ गडी राखून विजय मिळवून दिला.

डार्क व्ह्यू एक्सप्लोरर्स विरूद्ध फोर्ट शार्लेट स्ट्रायकर्स यांच्यात विन्सी प्रीमियर टी १० लीग स्पर्धेचा तिसरा सामना रंगला. स्ट्रायकर्स संघाने ५ बाद ७५ धावा केल्या. सलामीवीर पोप (२८) आणि आर विल्यम्स (२०) यांनी चांगली खेळी केली. स्टोव्हनेदेखील एक षटकार आणि एक चौकार लगावत १३ धावा केल्या. पण त्यांनी दिलेले आव्हान एक्सप्लोरर्स संघाने सहज पेलले. ८.३ षटकातच त्यांनी सामना आपल्या नावे केला. जेम्सने नाबाद १८ आणि थॉमसने नाबाद १७ धावा केल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2020 11:11 am

Web Title: cricket returns with chasing team wins amid coronavirus outbreak vincy premier t10 league vjb 91
Next Stories
1 करोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी आयसीसीचे पंच-खेळाडूंसाठी कठोर नियम
2 बाप तसा बेटा! धवनने शेअर केला जुना फोटो
3 ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धा ३० मे रोजी
Just Now!
X