तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात जाडेजानं अष्टपैलू खेळीनं भारतीय यांची मने जिंकली आहेत. प्रथम फलंदाजी करताना जाडेजानं ५० चेंडूत ६६ धावांची विस्फोटक खेळी केली. जाडेजानं हार्दिक पांड्याला साथ देत भारताला ३०० धावांचा टप्पा पार करुण देण्यात मोलाचा वाटा उचलला. जाडेजा आणि हार्दिक पांड्या यांच्यात सहाव्या गड्यासाठी नाबाद १५० धावांची भागिदारी झाली. या जोडगोळीच्या बळावर भारतीय संघानं ऑस्ट्रेलियासमोर ३०३ धावांचं आवाहन ठेवलं आहे. जाडेजाच्या विस्फोटक फलंदाजीनंतर नेटकऱ्यांनी संजय मांजरेकर यांना ट्रोल केलं आहे.

मांजरेकर यांनी ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान जाडेजाबाबत वक्तव्य केलं होतं. जाडेजासारख्या खेळाडूंना मी संघात ठेवणार नाही, अशा प्रकराचं वक्तव्य मांजरेकरांनी केलं होतं. २०१९ च्या विश्वचषकादरम्यानही मांजरेकर यांनी जाडेजाच्या खेळीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होतं. जाडेजानं विश्वचषकातही आपल्या कामगिरीनं मांजरेकरांना उत्तर दिलं होतं. आताही ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अष्टपैलू खेळी करत मांजरेकरांना उत्तर दिलं आहे.

जाडेजाच्या खेळीनंतर नेटकऱ्यांनी मांजरेकरांना चांगलेच धारेवर धरलं आहे. सोशल मीडियावर मांजेरकरांना ट्रोल करण्यात येत आहे.