दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डाने आपल्या घरच्या मैदानावर भारताविरुद्ध खेळवल्या जाणाऱ्या मालिकेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. तीन कसोटी, सहा वन-डे आणि तीन टी-२० असा भारताचा दक्षिण आफ्रिका दौऱ्यातला भरगच्च कार्यक्रम असणार आहे. ५ जानेवारीपासून भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याला सुरुवात होणार आहे.

याआधी भारताने श्रीलंकेत आपला पहिला परदेश दौरा केला होता. मात्र श्रीलंकेच्या संघाकडून भारताला एकदाही प्रतिकार न झाल्याने ही मालिका भारताने एकतर्फी जिंकली होती. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा दौरा हा भारतासाठी खडतर मानला जातोय.

असा असेल भारताचा दक्षिण आफ्रिका दौऱ्याचा कार्यक्रम

कसोटी सामने –

डिसेंबर ३०-३१ – दोन दिवसांचा सराव सामना

५ ते ९ जानेवारी – पहिली कसोटी, केप टाऊन

१३ ते १७ जानेवारी – दुसरी कसोटी, सेंच्युरियन

२४ ते २८ जानेवारी – तिसरी कसोटी, जोहान्सबर्ग

 

वन-डे सामने –

१ फेब्रुवारी – पहिला वन-डे सामना, किंग्समेड

४ फेब्रुवारी – दुसरा वन-डे सामना, सेंच्युरियन

७ फेब्रुवारी – तिसरा वन-डे सामना, केप टाऊन (दिवस-रात्र)

१० फेब्रुवारी – चौथा वन-डे सामना, जोहान्सबर्ग (दिवस-रात्र)

१३ फेब्रुवारी – पाचवा वन-डे सामना, सेंट जॉर्ज पार्क – पोर्ट एलिजाबेथ (दिवस-रात्र)

१६ फेब्रुवारी – सहावा वन-डे सामना, सेंच्युरियन (दिवस-रात्र)

 

टी-२० सामने –

१८ फेब्रुवारी – पहिला टी-२० सामना, जोहान्सबर्ग

२१ फेब्रुवारी – दुसरा टी-२० सामना, सेंच्युरियन (दिवस-रात्र)

२४ फेब्रुवारी – तिसरा टी-२० सामना, केप टाऊन (दिवस-रात्र)