News Flash

‘क्रिकेट साऊथ आफ्रिका’ फेसबुक पेजवर पोर्नोग्राफी!

द.आफ्रिकेच्या फेसबुक पेजचे ३३ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

द.आफ्रिकेचे फेसबुक पेज हॅक.

द.आफ्रिका क्रिकेटच्या अधिकृत फेसबुक पेजला हॅकर्सने लक्ष्य केले आहे. ‘क्रिकेट साऊथ आफ्रिका’ हे फेसबुक पेज हॅकर्सने हॅक केले असून, त्यावर अश्लील छायाचित्रे आणि व्हिडिओ शेअर करण्यात आले आहेत.
द.आफ्रिकेच्या फेसबुक पेजचे ३३ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. दररोज या पेजवरून द.आफ्रिका क्रिकेट संघाशी संबंधित विविध बातम्या आणि माहिती शेअर करण्यात येतात. मात्र, अचानक या फेसबुक पेजवर पोर्नोग्राफीची संबंधित मजकूर पोस्ट करण्यात आल्याने चाहते आश्चर्यचकीत झाले. आपले फेसबुक पेज हॅक झाल्याची माहिती मिळाल्यावर क्रिकेट साऊथ आफ्रिकेने याबाबत माफी देखील मागितली आहे. त्यानंतर काही वेळाने फेसबुक पेजवरील सर्व अश्लील मजकूर काढून टाकण्यात आला आणि अकाऊंट पूर्ववत करण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2015 12:15 pm

Web Title: cricket south africas official facebook page hacked explicit content posted
Next Stories
1 भारत-पाक मालिका २४ डिसेंबरपासून ?
2 पुणे आणि राजकोट नवे संघ
3 पॅलेसच्या मार्गात लुकाकूचा खोडा!