11 August 2020

News Flash

World Cup 2019 : पाकिस्तानचा मोहम्मद ठरला ‘आमिर’ गोलंदाज

ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यात घेतले ५ बळी

२०१९ विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज मोहम्मद आमिरने आपली नेहमीची लय पकडत दमदार पुनरागमन केलं आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यात अखेरच्या षटकांमध्ये टिच्चून मारा करत आमिरने निम्मा संघ गारद केला. अवघ्या ३० धावांमध्ये आमिरने कांगारुंचे ५ बळी टिपले. या कामगिरीसह मोहम्मद आमिर सध्याच्या विश्वचषक स्पर्धेत, १० षटकांनंतर सर्वात कमी धावा देऊन जास्त बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे.

विश्वचषक स्पर्धेतली गोलंदाजांची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी पुढीलप्रमाणे –

मोहम्मद आमिर – पाकिस्तान – (विरुद्ध ऑस्ट्रेलिया, ५/३०)
जिमी निशम – न्यूझीलंड – (विरुद्ध अफगाणिस्तान, ५/३१)
ट्रेंट बोल्ट – न्यूझीलंड – (विरुद्ध अफगाणिस्तान, ०/३४)
जसप्रीत बुमराह – भारत – (विरुद्ध दक्षिण आफ्रिका, २/३५)
ख्रिस मॉरिस – दक्षिण आफ्रिका – (विरुद्ध भारत, १/३६)

याचसोबत २०१७ साली झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर मोहम्मद आमिरच्या कामगिरीत कमालीची घसरण झाली होती. मात्र यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत आमिरने दमदार पुनरागमन करत ३ सामन्यांमध्ये १० बळी घेतले आहेत.

दरम्यान, नाणेफेक जिंकून पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमदने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र अरॉन फिंच आणि डेव्हिड वॉर्नर यांनी पहिल्या विकेटसाठी १४६ धावांची भागीदारी रचत पाकिस्तानच्या आक्रमणातही हवाच काढून घेतली. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करत दोन्ही फलंदाजांनी झटपट धावा जमवण्यास सुरुवात केली. मोहम्मद आमिरने ऑस्ट्रेलियन कर्णधार अरॉन फिंचला माघारी धाडत कांगारुंना पहिला धक्का दिला. यानंतर डेव्हिड वॉर्नरने स्मिथच्या साथीने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला.

मात्र स्टिव्ह स्मिथ आणि पाठीमागून आलेला ग्लेन मॅक्सवेल मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात माघारी परतले. दरम्यानच्या काळात वॉर्नरने आपलं शतक साजरं केलं. मात्र १०७ धावांवर तो ही माघारी परतला. यानंतर मधल्या फळीतल्या फलंदाजांनी हाराकिरी करत विकेट फेकण्यास सुरुवात केली. मोहम्मद आमिर, शाहिन आफ्रिदी यांनी भेदक मारा करत कांगारुंची अखेरची फळी कापून काढली. पाकिस्तानकडून मोहम्मद आमिरच्या ५ बळींव्यतिरीक्त शाहिन आफ्रिदीने २ तर हसन अली-वहाब रियाझ-मोहम्मद हाफिज यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2019 7:08 pm

Web Title: cricket world cup 2019 aus vs pak mohammad amir becomes most economical bowler psd 91
Next Stories
1 World Cup 2019 : अटीतटीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाची पाकिस्तानवर मात
2 ‘प्रेक्षकांनी कसे वागावे हे सांगण्याचा अधिकार कोहलीला नाही’, ब्रिटिश क्रिकेटपटूचे टिकास्त्र
3 World Cup 2019 : शिखरच्या अनुपस्थितीत विजय शंकरला संघात संधी?
Just Now!
X