18 January 2021

News Flash

World Cup 2019 : विराटला पिछाडीवर टाकत बाबर आझम ठरला बादशहा, अनोख्या विक्रमाची नोंद

वन-डे क्रिकेटमध्ये ३ हजार धावांचा टप्पा पूर्ण

पाकिस्तानचा युवा क्रिकेटपटू बाबर आझम आणि भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली यांच्यात होणारी तुलना आतापर्यंत अनेकांनी ऐकली असेल. भारतीय चाहत्यांच्या मते विराट कोहली हा बाबर आझमच्या तुलनेत सर्वोत्त फलंदाज असला तरीही विश्वचषकात बाबर आझमने न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात एका अनोख्या विक्रमाची नोंद केली आहे. बाबर आझमने वन-डे क्रिकेटमध्ये ३ हजार धावांचा टप्पा पूर्ण केला. १ हजार ते ३ हजार धावांचा टप्पा सर्वात जलद गाठण्याच्या निकषांमध्ये बाबरने विराट कोहलीला मागे टाकलं आहे.

याव्यतिरीक्त वन-डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद ३ हजार धावांचा टप्पा गाठणाऱ्या फलंदाजांच्या यादीतही बाबरने दुसरं स्थान मिळवलं आहे.

२३८ धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या पाकिस्तानी संघाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर फखार झमान आणि इमाम उल-हक ठराविक अंतराने माघारी परतले. मात्र यानंतर बाबर आझमने खेळपट्टीवर ठाण मांडत अर्धशतकी खेळी साकारली. त्याच्या या खेळीमुळे पाकिस्तानने १०० धावांचा टप्पाही पार केला.

अवश्य वाचा – वन-डे क्रमवारीत टीम इंडियाचा इंग्लंडला धोबीपछाड, पहिल्या स्थानावर झेप

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 26, 2019 10:32 pm

Web Title: cricket world cup 2019 babar azam becomes 2nd fastest batsman to complete 3 thousand runs broke virat kohli record psd 91
Next Stories
1 World Cup 2019 : टीम इंडियाच्या नवीन जर्सीबद्दल गोंधळ कायम
2 बाबर आझमच्या शतकामुळे पाकिस्तान विजयी, न्यूझीलंडवर मात; स्पर्धेतलं आव्हान कायम
3 World Cup 2019 : विंडीजविरुद्ध सामन्यात भुवनेश्वर संघात हवाच ! कारण….
Just Now!
X