News Flash

cricket world cup 2019 : सेलिब्रिटी कट्टा : उत्तम प्रेक्षक झालो..

क्रिकेट हा प्रचंड आवडीचा विषय असला तरी मला कधी मनासारखे खेळता आले नाही.

आमच्या ‘अमर फोटो स्टुडियो’ नाटकाचे सर्व प्रयोग योगायोगाने भारताच्या सामन्यादिवशीच असल्याने सामन्याचा थरार अनुभवता येत नाही. पण नाटकात माझे पात्र एका तंत्रज्ञानयुक्त म्हाताऱ्याचे असल्याने मध्येच येऊन तो सुरू असलेल्या सामन्याचा स्कोअर सांगतो आणि प्रेक्षक त्याला भरभरून दाद देतात. क्रिकेट हा प्रचंड आवडीचा विषय असला तरी मला कधी मनासारखे खेळता आले नाही. एकत्र कुटुंबपद्धतीत वाढल्याने आम्ही सर्व भाऊ  मिळून क्रिकेट खेळायचो. पण क्रिकेट खेळण्यापेक्षा समालोचन करण्यात मला जास्त रस असायचा. कोणत्या सामन्यात समालोचकाने काय विधान केले, तेही मला तोंडपाठ असायचे. कदाचित माझ्यातील अभिनयाची आवड मला ते करायला भाग पाडत असावी. पण यातूनच मी क्रिकेटचा खेळाडू न होता उत्तम प्रेक्षक झालो. त्यातले बारकावे, खेळी मी जाणून घेऊ  लागलो. काळानुसार क्रिकेटमध्ये खूप बदल होत गेले. आपल्या संघातील सर्व नवीन खेळाडू कसदार असले तरीही मी मात्र अजूनही जुन्याच संघाच्या प्रेमात आहे. सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आजही मनात घर करून आहे. गांगुलीची भेट घ्यावी ही इच्छा लवकरात लवकर पूर्ण व्हावी, अशी आशा आहे.

(शब्दांकन : नीलेश अडसूळ)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2019 4:06 am

Web Title: cricket world cup 2019 become the best audience zws 70
Next Stories
1 cricket world cup 2019 : आकडेपट : हीरकमहोत्सवी विजयाचे लक्ष्य
2 cricket world cup 2019  चर्चा तर होणारच.. : विश्वचषकातील सर्वोत्तम चेंडू?
3 Cricket World Cup 2019 : अर्वाच्य भाषेतील टीकेमुळे व्यथित!
Just Now!
X