२०१९ विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरी गाठण्याच्या दक्षिण आफ्रिकेच्या आशा आता मावळल्या आहेत. मात्र आपला अखरेचा विश्वचषक खेळणाऱ्या फिरकीपटू इम्रान ताहीरने पाकिस्तानविरुद्ध सामन्यात अनोख्या विक्रमाची नोंद केली आहे. विश्वचषक इतिहासात दक्षिण आफ्रिकेकडून सर्वाधिक बळी घेण्याचा मान ताहीरने मिळवला आहे. इम्रानने माजी जलदगती गोलंदाज अॅलन डोनाल्डचा ३८ बळींचा विक्रम मोडीत काढला.

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात इम्रान ताहीरने फखार झमान आणि इमाम उल-हक या फलंदाजांना माघारी धाडलं. पहिल्या विकेटसाठी दोन्ही फलंदाजांमध्ये ८१ धावांची भागीदारी झाली. मात्र ताहीरने ही जोडी फोडत आफ्रिकेला सामन्यात वरचढ होण्याची संधी दिली.