विश्वचषक स्पर्धा २०१९ मध्ये इंग्लंडच्या संघाला विश्वविजेतेपद मिळाले. न्यूझीलंडने २४१ धावा करून इंग्लंडला २४२ धावांचे आव्हान दिले होते. बेन स्टोक्स याने ८४ धावांची झुंजार खेळी केली. शेवटपर्यंत त्याने दिलेल्या झुंजीमुळे सामना सूपर ओव्हरमध्ये गेला. त्यानंतर सुपर ओव्हरमध्येही बेन स्टोक्सने धमाकेदार कामगिरी केली. पण सुपर ओव्हरमध्येही सामना अनिर्णित राहिला. त्यामुळे सर्वाधिक बाऊंड्री (चौकार-षटकार) मारण्याच्या निकषावर इंग्लंडला विश्वविजेता घोषित करण्यात आला. सामनावीर ठरलेल्या बेन स्टोक्सने दमदार खेळ करत न्यूझीलंडला पराभवाची चव चाखायला भाग पाडले. तरीदेखील ‘न्यूझीलंडर ऑफ द इयर’ या सन्मानासाठी बेन स्टोक्सला नामांकन मिळाले आहे.

बेन स्टोक्स हा मूळचा न्यूझीलंडचा आहे. त्याचा जन्म न्यूझीलंडमधील ख्राईस्टचर्च येथे झाला. पण विश्वचषकात तो इंग्लंडच्या संघाकडून खेळत होता. त्याच्या दुर्दैवाने त्याला अंतिम सामना आपल्या जन्मभूमीतील खेळाडूंविरोधात आणि मायदेशाविरोधात खेळावा लागला. त्याने इंग्लंडकडून खेळताना उत्तम कामगिरी केली आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला. त्यामुळे आता त्याला ‘न्यूझीलंडर ऑफ द इयर’ या सन्मानासाठी नामांकन मिळाले आहे.

विशेष म्हणजे न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन यालाही या सन्मानासाठी नामांकन

काय आहे ‘न्यूझीलंडर ऑफ द इयर’ सन्मान

‘न्यूझीलंडर ऑफ द इयर’ हे पुरस्कार सध्या ‘किवीबँक न्यूझीलंडर ऑफ द इयर’ नावाने दिले जातात. मूळ न्यूझीलंडच्या असलेल्या व्यक्तीने एखादे महान कार्य केले तर त्या कार्याची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात येतो. न्यूझीलंडच्या ऑकलंड येथे दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात हे सन्मान प्रदान केले जातात. २०१० मध्ये ऑस्ट्रेलियाच्या जेफरी जॉन हॉप यांनी हे सन्मान सुरु केले.