News Flash

चर्चा तर होणारच.. शतकातील सर्वोत्तम झेल!

इंग्लंडचा माजी फिरकीपटू फिल टफनेलने तर हा ‘शतकातील सर्वोत्तम झेल’ असल्याचे म्हटले आहे.

विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यात अपेक्षेप्रमाणे इंग्लंडने बाजी मारत घरच्या प्रेक्षकांना खूश केले. मात्र या सामन्यात इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्सने सीमारेषेवर घेतलेल्या अफलातून झेलने तर प्रेक्षकांसह माजी क्रिकेटपटूंची मने जिंकली. इंग्लंडचा माजी फिरकीपटू फिल टफनेलने तर हा ‘शतकातील सर्वोत्तम झेल’ असल्याचे म्हटले आहे. वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपटू इयान बिशप आणि भारताचा माजी सलामीवीर आकाश चोप्रा यांनीदेखील स्टोक्सच्या या झेलची ‘ट्विटर’वर मुक्तकंठाने प्रशंसा केली असून अनेक क्रिकेटप्रेमींनीदेखील या झेलवर स्तुतिसुमने उधळल्याचे समाजमाध्यमांवर दिसत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2019 3:41 am

Web Title: cricket world cup 2019 ben stokes produces one of the best world cup catches
Next Stories
1 आकडेपट : विक्रमी धावसंख्या साकारणार?
2 सेलिब्रिटी कट्टा : आयनॉक्सला सामना पाहणार!
3 विंडिजविरुद्ध पराभवानंतर पाकिस्तानचा संघ ट्रोल, नेटकऱ्यांनी घेतली फिरकी
Just Now!
X