13 July 2020

News Flash

Video : नवीन जर्सीला विराटने दिले १० पैकी *** मार्क, तुम्ही किती द्याल ?

इंग्लंडविरुद्ध सामन्यात भारत भगव्या रंगाची जर्सी घालणार

२०१९ विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाच्या भगव्या जर्सीबद्दलचा संभ्रम अखेरीस संपला आहे. इंग्लंडविरुद्ध सामन्यासाठी भारतीय संघ भगव्या रंगाची जर्सी घालून बर्मिंगहॅमच्या मैदानावर उतरले. ICC ने यंदाच्या हंगामात Home आणि Away सामन्यांकरता वेगळ्या रंगाची जर्सी घालण्याचा नियम केला आहे. त्यानुसार भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध सामन्यासाठी भगव्या रंगाची जर्सी घालणार आहे.

इंग्लंडविरुद्ध सामन्याआधी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी विराटला नवीन जर्सीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावेळी विराटने आपल्याला ही जर्सी आवडली असून केवळ एका सामन्याकरता खेळाडू ही जर्सी घालणार असल्यामुळे याला १० पैकी ८ मार्क देईन, असं म्हटलं.

“जर्सीमध्ये केलेला हा बदल केवळ एका सामन्यापुरता असणार आहे, त्यामुळे कोणाचं मन राखायचं म्हणून नाही, पण मला डिजाईन खरंच आवडलं आहे. आगामी काळात रंग बदलेल असं मला वाटत नाही. कारण निळ्या रंगाची जर्सी घालून खेळणं ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.” विराट पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तरं देत होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 29, 2019 6:59 pm

Web Title: cricket world cup 2019 captain kohli gives the new jersey 8 out off 10 psd 91
टॅग Virat Kohli
Next Stories
1 World Cup 2019 : अफगाणिस्तानने विजयाची संधी दवडली, पाकिस्तानचं आव्हान कायम
2 Video : विमानावर Justice for Baluchistan चा संदेश, सामन्याआधी पाक-अफगाण चाहते भिडले
3 World Cup 2019 : विराट, विजय शंकरला संघातून काढू नकोस ! माजी इंग्लिश खेळाडूची विनंती
Just Now!
X