२०१९ विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत ४ विजयांची नोंद करणाऱ्या भारतीय संघासमोर आता वेस्ट इंडिजचं आव्हान असणा आहे. गुरुवारी वेस्ट इंडिजच्या संघाशी मँचेस्टरच्या मैदानात टीम इंडिया दोन हात करेल. विंडीजच्या संघाची या स्पर्धेतली सुरुवात फारशी आशादायक झालेली नाही. ६ सामन्यांमध्ये १ विजय आणि ४ पराभवांसह विंडीजचा संघ ३ गुणांनिशी आठव्या स्थानावर आहे. उपांत्य फेरी गाठण्यासाठी वेस्ट इंडिजच्या आशा जवळपास धुळीला मिळाल्या असल्या तरीही विंडीजचा सलामीवीर ख्रिस गेल आशावादी आहे. गुरुवारी रंगणाऱ्या सामन्याआधी ख्रिस गेल पत्रकारांशी संवाद साधत होता.

अवश्य वाचा – World Cup 2019 : या धोनीचं करायचं काय? टीम इंडियाच्या मॅनेजमेंटसमोर गहन प्रश्न

“उपांत्य फेरी गाठण्याची आम्हाला अजुनही संधी आहे. भारताविरुद्ध सामन्यात आम्ही पूर्ण तयारीनिशी मैदानावर उतरणार आहोत. आमच्यासाठी हे मोठं आव्हान असणार आहे. भारतीय संघ सध्या चांगल्या फॉर्मात आहे, त्यामुळे त्यांच्याविरुद्ध चांगला खेळ करण्याची मी वाट पाहतो आहे.” गेल बोलत होता.

अवश्य वाचा – WC 2019 IND vs WI : बुमराहच्या यॉर्करची ख्रिस गेलला धडकी, म्हणाला…

दरम्यान वेस्ट इंडिजविरुद्ध सामन्यात टीम इंडियासमोर आता नवीन चिंता आहे. अफगाणिस्तानविरुद्ध सामन्यात भारताला विजयासाठी संघर्ष करावा लागला होता. त्यामुळे अफगाणिस्तानविरुद्ध सामन्यात संथ खेळी करणाऱ्या धोनीची फलंदाजीतली जागा बदलण्याच्या विचारात संघ व्यवस्थापन असल्याचं कळतंय.

अवश्य वाचा – World Cup 2019 : केदार जाधव चौथ्या क्रमांकासाठी योग्य पर्याय !