05 March 2021

News Flash

Aus vs Ban : सोळावं शतक मोक्याचं, धवनला मागे टाकत वॉर्नर ठरला ‘गब्बर’

बांगलादेशविरुद्ध सामन्यात केलं शतक

बॉल टॅम्परिंग प्रकरणानंतर ऑस्ट्रेलियाच्या संघात पुनरागमन करणाऱ्या डेव्हिड वॉर्नरने आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलं आहे. बांगलादेशविरुद्ध सामन्यात डेव्हिड वॉर्नरने शतक झळकावत, आपल्या संघाला दमदार सुरुवात करुन दिली. डेव्हिड वॉर्नरचं वन-डे क्रिकेटमधलं हे १६ वं शतक ठरलं आहे. सर्वात कमी डावांमध्ये १६ वं शतक झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत वॉर्नर तिसऱ्या स्थानावर पोहचला आहे. त्याने शिखर धवनचा विक्रम मोडीत काढला आहे. शिखरने १२६ डावांमध्ये १६ वं शतक ठोकलं होतं, तर वॉर्नरने केवळ ११० डावांमध्ये ही कामगिरी करुन दाखवली.

डेव्हिड वॉर्नरने पहिल्या विकेटसाठी कर्णधार अरॉन फिंच याच्यासोबत १२१ धावांची भागीदारी केली. बांगलादेशी गोलंदाजांचा समाचार घेत वॉर्नरने मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करत शतक झळकावलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 20, 2019 5:37 pm

Web Title: cricket world cup 2019 david warner slams 16th ton surpass shikhar dhawan against bangladesh psd 91
टॅग : David Warner
Next Stories
1 Video : अरेरे! झकास फटका, पण दुर्दैवाने झाला हिट विकेट…
2 World Cup 2019 : तुझं दुःख मी समजू शकतो, सचिन तेंडुलकरकडून शिखरचं सांत्वन
3 World Cup 2019 : इंग्लंडविरुद्ध टीम इंडिया नवीन रुपात, भगव्या जर्सीमध्ये मैदानात येणार
Just Now!
X