दीपक जोशी

यंदाच्या विश्वचषकात आतापर्यंत चार विजय मिळवणाऱ्या इंग्लंडला गेल्या तीन विश्वचषकांत (२००७, २०११, २०१५) श्रीलंकेविरुद्ध पराभव पत्करावा लागला आहे. १९९९मध्ये लॉर्ड्सवर झालेल्या सामन्यात इंग्लंडने शेवटचे श्रीलंकेला पराभूत केले होते. त्यामुळे इंग्लंडला पराभवाची कोंडी फोडण्याची संधी आहे. त्याशिवाय लॉर्ड्स येथे झालेल्या गेल्या सहा सामन्यांत इंग्लंडने बाजी मारली असून जुलै २०११मध्ये श्रीलंकेनेच इंग्लंडला या मैदानावर शेवटची धूळ चारली आहे. दुसरीकडे विश्वचषकातील अमृतमहोत्सवी सामन्यात श्रीलंका विजय मिळवणार का, हे पाहणे रंजक ठरेल. इंग्लंड-श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय सामन्यांत वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाने २९ सामन्यांतून ४४ बळी मिळवले असून त्याला बळींचे अर्धशतक पूर्ण करण्याची संधी आहे.