17 July 2019

News Flash

World Cup 2019 : तुझं दुःख मी समजू शकतो, सचिन तेंडुलकरकडून शिखरचं सांत्वन

शिखर दुखापतीमुळे संघाबाहेर

टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवन अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे संघाबाहेर गेला आहे. बुधवारी संध्याकाळच्या दरम्यान बीसीसीआयने याबद्दलची अधिकृत घोषणा केली. शिखर धवनच्या जागी डावखुरा फलंदाज आणि यष्टीरक्षक ऋषभ पंतला भारतीय संघात जागा मिळाली आहे. यानंतर शिखरने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट करत, Show Must Go On असं म्हणत सर्व चाहत्यांचे आभार मानले. भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने शिखरचं सांत्वन केलं आहे.

मी तुझं दु:ख समजू शकतो, विश्वचषक स्पर्धेच्या मधूनच दुखापतीमुळे बाहेर पडणं यासारखी वाईट गोष्ट नाही. तू यामधुन लवकर बाहेर पडशील याची मला खात्री आहे. अशा आशयाचं ट्विट करत सचिनने शिखरला धीर दिला आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यात पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर खेळत असताना चेंडू शिखरच्या अंगठ्याला लागला होता. यानंतर शिखरच्या तब्येतीमध्ये सुधारणा होईल अशी आशा होती. मात्र त्याच्या तब्येतीत सुधारणा न झाल्याने अखेर बीसीसीआयने शिखर धवनच्या जागी ऋषभ पंतला संघात जागा दिली आहे.

अवश्य वाचा – World Cup 2019 : इंग्लंडविरुद्ध टीम इंडिया नवीन रुपात, भगव्या जर्सीमध्ये मैदानात येणार

First Published on June 20, 2019 4:54 pm

Web Title: cricket world cup 2019 feel for dhawan getting injured during wc heartbreaking says sachin tendulkar psd 91