दिग्पाल लांजेकर

तसा मी क्रिकेटचा चाहता वगैरे नाही. खास वेळ काढून सामने बघणे जमत नाही. पण चित्रीकरण सुरू असताना सेटवर कुणीतरी सामन्याच्या घडामोडी सांगत असतो. मग किती खेळाडू बाद झाले आहेत, किती धावा हव्या आहेत, अशी मी विचारपूस करतो. कधी पुढील दिवशी सामन्याची क्षणचित्रे पाहात असतो. भारतीय संघ विश्वचषकातून बाहेर पडला तरी चाहत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना संयम राखल्याचे पाहायला मिळाले. आता चाहतेही समजूतदार झाले आहेत. जिंकलो की उडय़ा मारणे आणि हरलो की टोकाची टीका करणे, हे प्रमाण आता कमी झाले आहे. आधी विश्वचषक म्हटला की, जीवन-मरणाचा प्रश्न असल्यागत त्याकडे पाहिले जायचे. आता खेळाडूंवरचा ताण हलका झाला आहे. यापुढे खेळाडू चांगले खेळतील. भारतीय संघातील खेळाडूंच्या कष्टांचे नेहमीच कौतुक वाटते. विराट कोहली आणि रोहित शर्मा हे माझे आवडते खेळाडू आहेत. आता इंग्लड आणि न्यूझीलंड या दोन संघांपैकी एकाने विश्वचषक जिंकावा, असे वाटते.

(शब्दांकन : भक्ती परब)