२०१९ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडने ऑस्ट्रेलियावर मात करत तर न्यूझीलंडने भारतावर मात करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. क्रिकेटच्या कोणत्याही सामन्यात नाणेफेक जिंकणं म्हणजे अर्धी लढाई जिंकणं असं मानलं जातं. मात्र विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत नाणेफेकीचा इतिहास हा काही वेगळचं सांगतो आहे.

विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकणारा संघ आतापर्यंत सातवेळा सामना हरलेला आहे. याचसोबत गेल्या ५ अंतिम सामन्यामध्ये ४ वेळा नाणेफेक जिंकलेला संघ सामना हरला आहे. त्यामुळे अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकलेला केन विल्यमसनचा न्यूझीलंड संघ कशी कामगिरी करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.