News Flash

World Cup 2019 : भारतीय फलंदाजांच्या नावावर लाजिरवाणा पराक्रम

आघाडीचे तिन्ही फलंदाज १ धाव काढत माघारी

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय संघाची अतिशय खराब सुरुवात झाली. पावसाने व्यत्यय आणल्यानंतर, दुसऱ्या दिवसाच्या खेळात भारताने न्यूझीलंडला २३९ धावांवर रोखलं. मात्र २४० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवातही खराब झाली. सलामीवीर रोहित शर्मा, लोकेश राहुल आणि कर्णधार विराट कोहली हे अवघी १ धाव काढून माघारी परतले. वन-डे क्रिकेटच्या इतिहासात भारताच्या आघाडीच्या फळीतले तिन्ही फलंदाज एक धाव काढून माघारी परतण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे.

मॅट हेन्रीने लोकेश राहुल आणि रोहित शर्माला यष्टीरक्षक टॉम लॅथमकरवी झेलबाद केलं. तर कर्णधार विराट कोहली ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर पायचीत होऊन माघारी परतला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 10, 2019 4:13 pm

Web Title: cricket world cup 2019 first time ever in odi history the top 3 batsmen for a team have all got out for 1 run each psd 91
Next Stories
1 World Cup 2019 Semi Final Ind vs NZ : रविंद्र जाडेजाची झुंज अपयशी, भारताचं आव्हान संपुष्टात
2 टीम इंडियासाठी कायपण.. सामना पाहण्यासाठी १८ देश अन् दोन खंडांमधून गाडीने प्रवास
3 या एका स्क्रीनशॉर्टमुळे मोहम्मद शामीला संघातून वगळले?
Just Now!
X