News Flash

आकडेपट : विक्रमी धावसंख्या साकारणार?

न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसन्सचा हा तिसरा विश्वचषक आहे.

न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसन्स

दीपक जोशी

श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या सामन्यात ट्रेंट बोल्ट विरुद्ध लसिथ मलिंगा यांच्यातील वेगवान माऱ्याचे युद्ध रंजक ठरणार आहे. श्रीलंका कर्णधार दिमुथ करणरत्नेचा हा दुसरा विश्वचषक, परंतु कर्णधार म्हणून पहिल्याच विश्वचषक स्पध्रेत खेळत आहे. मागील विश्वचषक स्पध्रेत तो चार सामने खेळला आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसन्सचा हा तिसरा विश्वचषक आहे. पण २०११ व २०१५मधील १३ सामन्यांचे नेतृत्व त्याच्या गाठीशी आहे.

ऑस्ट्रेलिया-अफगाणिस्तान यांच्यात दुसरा सामना आहे. अफगाणिस्तानचा हा दुसराच विश्वचषक आहे. २०१५मध्ये पदार्पणात सहापैकी एकमेव अटीतटीचा सामना स्कॉटलंडविरुद्ध केवळ एक गडी राखून जिंकत त्यांनी आपली छाप पाडली होती. मागील विश्वचषक स्पध्रेत ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानविरुद्ध ५० षटकांत ६ बाद ४१७ धावांचा डोंगर उभारला आणि हा सामना विक्रमी २७५ धावांनी जिंकला. विश्वचषक स्पध्रेतील ही सर्वोच्च धावसंख्या नोंदली गेली. हेच दोन प्रतिस्पर्धी पुन्हा आमनेसामने आहेत. त्यामुळे पाचशे धावांचा विक्रम साकारला जातो का, याकडे क्रिकेटरसिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2019 3:37 am

Web Title: cricket world cup 2019 highest score recorded in world cup
Next Stories
1 सेलिब्रिटी कट्टा : आयनॉक्सला सामना पाहणार!
2 विंडिजविरुद्ध पराभवानंतर पाकिस्तानचा संघ ट्रोल, नेटकऱ्यांनी घेतली फिरकी
3 पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव, नोंदवले नकोशे ७ विक्रम
Just Now!
X