06 July 2020

News Flash

चहलकडून अनेक गोष्टी शिकता येण्यासारख्या – कुलदीप यादव

कुलदीपकडून चहलचं कौतुक

कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल या जोडीने थोड्या कालावधीमध्ये भारतीय वन-डे संघात आपली जागा पक्की केली आहे. विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामन्यात युजवेंद्र चहलने ४ बळी घेत आफ्रिकेच्या डावाला खिंडार पाडलं होतं. कुलदीपने एक बळी घेत त्याला चांगली साथ दिली होती. या कामगिरीनंतर कुलदीप यादवने आपला सहकारी चहलचं कौतुक केलं आहे.

अवश्य वाचा – टीम इंडियाच्या सरावसत्रावर पाणी

“चहल माझ्यापेक्षा अनुभवी गोलंदाज आहे. एखाद्या फलंदाजाची विकेट घ्यायची असेल तर कशी गोलंदाजी करावी याची त्याला माहिती आहे. मला त्याच्याकडून हे शिकायला आवडेल. मी आणि चहलने आफ्रिकेविरुद्ध सामन्यासाठी आखलेली रणनिती १०० टक्के कामी आली. गरजेच्या वेळी धावांवर अंकुश लावणं, विकेट घेणं ही सर्व कामं आम्ही करुन दाखवली आहेत.” कुलदीप पत्रकारांशी बोलत होता.

नुकत्याच पार पडलेल्या आयपीएलच्या बाराव्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळणाऱ्या कुलदीपला आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. मात्र टी-२० आणि वन-डे सामन्यात परिस्थिती वेगळी असते, आम्ही आखलेल्या रणनितीनुसार मी मारा करत राहिलो तर मला नक्की यश मिळेल, असं कुलदीपने स्पष्ट केलं.

अवश्य वाचा – तू देशाऐवजी पैशाला प्राधान्य दिलंस, शोएब अख्तरची डिव्हीलियर्सवर बोचरी टीका

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 8, 2019 4:47 pm

Web Title: cricket world cup 2019 how to work out a batsman can be learnt from yuzvendra chahal says kuldeep yadav
Next Stories
1 टीम इंडियाच्या सरावसत्रावर पाणी
2 तू देशाऐवजी पैशाला प्राधान्य दिलंस, शोएब अख्तरची डिव्हीलियर्सवर बोचरी टीका
3 सुब्रमण्यम स्वामींचा धोनीला सल्ला
Just Now!
X