News Flash

Ind vs Aus : विजय मल्ल्या ओव्हलच्या मैदानावर, म्हणाला मी सामना पहायला आलोय !

एएनआय वृत्तसंस्थेने जाहीर केले फोटो

२०१९ विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने पहिल्या सामन्यात आफ्रिकेवर मात करत आश्वासक सुरुवात केली. लंडनमधील ओव्हलच्या मैदानावर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणाऱ्या सामन्यादरम्यान, भारतामध्ये बँकाना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालून पसार झालेल्या विजय मल्ल्यानेही हजेरी लावली आहे. एएनआय वृत्तसंस्थेने विजय मल्ल्याचे मैदानात जातानाचे फोटो शेअर केले आहेत.

यावेळी विजय मल्ल्याची प्रतिक्रीया घेण्यासाठी प्रसारमाध्यमांनी प्रयत्न केला. मात्र मी सामना पाहण्यासाठी आलो आहे, असं म्हणत मल्ल्याने अधिक काही बोलण्यास नकार दिला. दरम्यान भारत आणि ब्रिटन सरकारमध्ये विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणावरुन वाटाघाटी सुरु आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2019 3:54 pm

Web Title: cricket world cup 2019 ind vs aus vijay mallya makes presence in match psd 91
टॅग : Ind Vs Aus,Vijay Mallya
Next Stories
1 World Cup 2019 : रोहितचा झेल टिपण्यासाठी कुल्टर-नाईलची भन्नाट उडी, पण….
2 World Cup 2019 : ऑस्ट्रेलियन कर्णधार फिंच म्हणतो, विराट नव्हे स्टिव्ह स्मिथ सर्वोत्तम फलंदाज !
3 World Cup 2019 IND vs AUS : भारताचा ‘गब्बर’ विजय; कांगारूंच्या विजयरथाला ‘ब्रेक’
Just Now!
X