News Flash

Ind vs Pak : भारताच्या अडचणींमध्ये भर, भुवनेश्वर कुमार दुखापतीमुळे मैदानाबाहेर

भुवनेश्वरचे पायाचे स्नायू दुखावले

२०१९ विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघासमोरची संकट काही केल्या कमी होण्याची चिन्ह दिसत नाहीयेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यात अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे सलामीवीर शिखर धवन १०-१२ दिवसांसाठी संघाबाहेर गेला आहे. त्यातच पाकिस्तानविरुद्ध सामन्यात भारताचा जलदगती गोलंदाज भुवनेश्वर कुमारला दुखापत झालेली आहे.

भारताकडून पाचवे षटक टाकत असताना भुवनेश्वरने ४ चेंडू टाकले. चौथ्या चेंडूदरम्यान आपल्याला त्रास होत असल्याचं भुवनेश्वरला जाणवलं, त्यानंतर भुवनेश्वर थेट मैदानाबाहेर गेला. त्याचे स्नायू दुखावल्याची माहिती समोर येते आहे, त्यामुळे भुवनेश्वर कुमारने पाकिस्तानविरुद्ध उर्वरित सामन्यात मैदानात न उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान भुवनेश्वर कुमार माघारी परतल्यानंतर विजय शंकरने उरलेलं षटक पूर्ण केलं. यावेळी पहिलाच चेंडू टाकताना शंकरने इमाम उल-हकला पायचीत करत पाकिस्तानला पहिला धक्का दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2019 9:08 pm

Web Title: cricket world cup 2019 ind vs pak bhuvaneshwar kumar out of game due to hamstring injury psd 91
टॅग : Bhuvaneshwar Kumar
Next Stories
1 IND vs PAK : …आणि जुळून आला टीम इंडियासाठी सुखद योगायोग
2 Ind vs Pak : विराटला मागे टाकत रोहित शर्माची बाजी, केली अनोख्या विक्रमाची नोंद
3 Ind vs Pak : साहेबांच्या देशात भारताच्या हिटमॅनचा पराक्रम, ‘गब्बर’ साथीदाराला टाकलं मागे
Just Now!
X