18 November 2019

News Flash

Ind vs Pak : साहेबांच्या देशात भारताच्या हिटमॅनचा पराक्रम, ‘गब्बर’ साथीदाराला टाकलं मागे

पाकिस्तानविरुद्ध रोहितची शतकी खेळी

सलामीवीर रोहित शर्माने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात शतक झळकावत आपण फॉर्मात असल्याचं दाखवून दिलं. रोहित शर्माने ११३ चेंडूत १४० धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत १४ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. या खेळीदरम्यान रोहितने इंग्लडच्या धरतीवर आणखी एक पराक्रम केला आहे.

अवश्य वाचा – Ind vs Pak : कोणालाही जमलं नाही ते रोहितने करुन दाखवलं, जाणून घ्या…

इंग्लंडच्या धरतीवर वन-डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद १ हजार धावा पूर्ण करण्याचा मान आता रोहित शर्माच्या खात्यात जमा झाला आहे. त्याने १८ डावांमध्ये ही कामगिरी केली आहे. रोहितने आपला सहकारी शिखर धवनचा १९ डावांचा विक्रम मोडला आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे शिखर धवनने ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामन्यामध्ये ही कामगिरी केली होती.

रोहित शर्माने शिखर धवनच्या साथीने पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी करत संघाला आश्वासक सुरुवात करुन दिली. पाकिस्तानी गोलंदाजांचा समाचार घेत रोहितने मैदानाच्या चौफेर फटकेबाजी केली. या विश्वचषक स्पर्धेतलं रोहित शर्माचं हे दुसरं शतक ठरलं आहे. याआधी सलामीच्या सामन्यात रोहितने आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात शतक ठोकलं होतं.

First Published on June 16, 2019 7:06 pm

Web Title: cricket world cup 2019 ind vs pak rohit becomes fastest batsman to complete 1 thousand runs in england psd 91
Just Now!
X