भारतीय संघाचा विश्वचषक स्पर्धेतील प्रवास ५ जूनला सुरु होणार आहे. दक्षिण आफ्रिकेशी भारतीय संघाचा सामना होणार आहे. आफ्रिकेचा संघ पहिल्या २ सामन्यात पराभूत झाल्यामुळे भारतीय संघाविरुद्ध त्यांना दमदार पुनरागमन करणे गरजेचे आहे. तर भारतीय संघदेखील स्पर्धेची विजयी सुरुवात करण्यास उत्सुक आहे. अनेक माजी खेळाडू आणि क्रिकेट जाणकारांनी भारतीय संघ या स्पर्धेसाठी विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असल्याचे म्हटले आहे. याबरोबरच साऱ्यांचे लक्ष १६ जूनला होणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्याकडेही लागलेले आहे. या सामन्याबाबत भारताचा फिरकीपटू हरभजन सिंग याने महत्वाचे विधान केले आहे.

एका मुलाखतीत हरभजन सिंग याने विश्वचषक स्पर्धेच्या आपल्या आठवणी सांगितल्या. तसेच भारतीय संघाचा पाकिस्तानशी होणारा सामना याबाबतही एक विधान केले आहे. “विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला पराभूत करण्याचा दम पाकिस्तानच्या संघामध्ये नाही. भारताला धूळ चारण्याची संधी पाकिस्तानच्या संघाला विश्वचषक स्पर्धेत नक्कीच नाही”, असा विश्वास हरभजनने व्यक्त केला आहे.

“पाकिस्तानच्या संघात आधी अनेक चांगले खेळाडू होऊन गेले, पण तेव्हादेखील भारताला पराभूत करणे पाकिस्तानला शक्य झाले नव्हते. त्यांच्या आधीच्या संघांच्या तुलनेत आताचा संघ काहीसा अप्रभावी आहे. त्यामुळे आता तर भारताला पराभूत करणे पाकिस्तानला शक्यच नाही”, असे हरभजन म्हणाला.

विश्वचषकासाठी १५ जणांची टीम इंडिया –

विराट कोहली (कर्णधार)
रोहित शर्मा (उपकर्णधार)
शिखर धवन
लोकेश राहुल
महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक)
हार्दिक पांड्या
विजय शंकर
केदार जाधव
मोहम्मद शमी
भुवनेश्वर कुमार<br />कुलदीप यादव<br />युझवेंद्र चहल
दिनेश कार्तिक (राखीव यष्टीरक्षक)
जसप्रित बुमराह
रवींद्र जाडेजा